जांभिवली धरणातुन पाणी शेतीला मिळणार 

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) - जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवली परिसरातील शेतक-यांना रब्बीच्या हंगामातील पिकांना शनिवार (ता.15) पासुन पाणी सोडण्यात येणार आहे.

जांभिवली येथील धरणाच्या पाण्यावर जांभिवली, सवने बाजूच्या इतर गाव आणि वाड्यांतील शेतकरी रब्बीच्या हंगामात भात आणि इतर भाजीपाल्याचे पिक घेत आहेत. या सिंचन साधनाचा शेतक-यांना मागील पस्तीस वर्षांपासून मोठा आधार झाला आहे. त्यामुळे जांभिवली परिसरात हरितक्रांती झाली आहे.

दरम्यान धरणाची जँकवेल मधील झडप नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे झडपेतुन आणि बाधांतुन आशी दोन ठिकाणी पाणी गळती होऊन पाणी वाया गेले आहे. तसेच पावसानेही यंदाच्या वर्षी लवकर पाठ फिरवली असल्याने धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पिकांना पाण्याचा तुटवडा भासु नये, म्हणुन एकच जांभिवली गावातील शेतक-यांना शेतीला पाणी मिळण्याची शक्याता आहे. 

जँकवेल मधील झडप नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे पाणी गळती होऊन वाया जात आहे. गळती रोखण्यासाठी उपाय योजना व इतर काम हंगाम संपला की मे व जुन मध्ये करण्याचे प्रयत्न आहे. मागील वर्षा प्रमाणे शेतीला पाणी देण्यात येईल. तरी शेतक-यांनी शेतातील कामे वेळेत उरकुन घ्यावेत. 
पदमाकर आडरी, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग 

Web Title: farmers will get from jambhivali dam