आंबोली परिसरात वायंगणी शेतीची लगबग

अनिल चव्हाण
बुधवार, 19 डिसेंबर 2018

आंबोली - चौकुळ येथे माती आणि संस्कृतीची ओळख सांगणारी वायंगणी शेतीची लगबग वाढली आहे. ही शेती पारंपारिक साधनांचा वापर करून होते. विशेष म्हणजे ही शेती नदीपात्रात केली जाते.

आंबोली, चौकुळ, गेळे ही तिन्ही गावे येथे पावसाळ्यात जंगल तोडून नागलीची शेती करतात व उन्हाळ्यात वायंगणी शेती करतात. अलिकडच्या 20 वर्षात यात फार मोठे बदल झाले आहेत. वन्यप्राण्यांचा प्रादूर्भाव आणि वाढती महागाई यामुळे हिशेबाचा मेळ लागत नसल्याने शेतीकडचा ओढा कमी होऊ लागला. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी येथील तिन्ही गावात शेतीचे प्रमाण घटत गेले.

आंबोली - चौकुळ या गावात खोती पध्दतीने वायंगणी शेती केली जाते. येथे नदी पात्रात वायंगणी शेती केली जाते. पावसाळ्यानंतर नदीचा प्रवाह कमी होताच पात्रातच वाफे तयार करून शेती होते. आता आंबोलीत शेती जवळपास बंदच झाली आहे. चौकुळमध्ये वायंगणी शेती अजूनही काही प्रमाणात टिकून आहे.

चाैकुळ येथे वायंगणी शेतीत भात शेती केली जाते. तसेच वन्यप्राण्यांसाठी माळा घातला जातो. या शेतीत पूर्वी मशागत करताना कोंबड्याचे जेवण त्यानंतर लावणी करताना स्थानिक ओव्या, रामायण, महाभारतातील कथा सांगितल्या जायच्या. त्याचबरोबर सामुदायिक शेतीत एकमेकांकडे काम केले जायचे. त्यानंतर कापणी, मळणी, बलुतेदारांना शेर-पायली धान्य देणे असे प्रकार होते. आता बलुतेदारी बंद झाली.

दरवर्षी नदीत शेती केल्यामुळे जमिनीची उंची एकसारखी ठेवण्यास मदत होते. अशा शेतीने गाळ साचत नाही. परिणामी कोंडी भरत नाहीत. पूर्वी नदीत शेतीसाठी ओहोळ केले जायचे; मात्र आता दरवर्षी गाळाने नदी भरत असल्याने कोंडीही भरतात. परिणामी आता आंबोलीसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागते.

सध्या चौकुळमधील शेतीमुळे येथील संस्कृती जिवंत राहीली आहे. सध्या नदीपात्रात ही शेती केली जात आहे.

Web Title: farming in River in Amboli Region