पित्याने पोटच्या मुलीची कोयत्याने गळा चिरुन हत्या

अमित गवळे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पाली, ता. १९ (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दहिगाव येथे एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीची शुक्रवारी (ता.१९) कोयत्याने गळा चिरुन हत्या केली. निर्दयी पित्याने मुलीचा मृतदेह जंगलातून खांद्यावर गावात आणला.

याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, राम हरी जाधव (वय ३५) मुळ राहणार झापवाडी, सध्या मुक्काम दहिगाव आदिवासीवाडी याने शालू जाधव (वय ४) या स्वताच्या मुलीची जंगलात नेऊन कोयत्याने गळा चिरुन हत्या केली. राम जाधव याने मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह चक्क खांद्यावर दहिगावात आणला. मुलीची मावशी लक्ष्मी मधू वाघमारे हिच्या घरात ठेवला. कौटुंबिक वादातून व दारुच्या नशेत ही हत्या झाली असल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पाली पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक एन.डी.चव्हाण, पो.हे.कॉ. एस.एस.खेडेकर, पो.ना. नरेश जाधव, पो.कॉ. आर.डी.कांदे, के.एन. भोईर आदिंनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपीला तत्काळ अटक केली. याबाबत पाली पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिस करीत आहेत.

Web Title: father killed his daughter