प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी कुणबी समाज हे स्थापणार

Federation Establishment To Solve Questions Of Kunabi Community
Federation Establishment To Solve Questions Of Kunabi Community

मंडणगड ( रत्नागिरी ) - विविध सामाजिक संघटना, संस्था व राजकीय पक्षांत विखुरलेल्या कुणबी समाजाला विचार आणि उद्देशाने एकत्रित गुंफण्यासाठी फेडरेशन स्थापन करण्याचा निश्‍चय करण्यात आला. त्याचा आवाज पाच जिल्ह्यात घुमला आहे. कुणबी राजकीय पदाधिकारी व्हाट्‌सएप ग्रुपमधील तरूणांनी पुढाकार घेत 23 फेब्रुवारीला दादर, मुंबई देवाडीगा सभागृहात यावर महाचर्चा घडवून आणली. नेहमीच्या विचारसरणीला फाटा दिला. विविध राजकीय, सामाजिक नामवंत कुणबी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहिल्याने आगामी काळात नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कुणबी समाज बहुसंख्येने आहे. मात्र तो वेगवेगळ्या दिशेने प्रवास करीत असल्याने समाजाचे प्रश्न, मागण्या व राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित आहे. त्याचे मूळ कारण शोधत त्यावर कायमचा उपाय करण्यासाठी तरुण पुढे आले. विखुरलेल्या समाजाला एकविचाराने गुंफण्याचा चंग बांधण्यात आला. विविध संस्थांचे, संघटनांचे प्रतिनिधी कुणबी फेडरेशनच्या माध्यमातून एकाच ध्येयावर आणण्याचे शिवधनुष्य उचलण्यात आले आहे.

विविध तालुक्‍यातील स्थानिक राजकीय कुणबीनेते पक्षीय घोंगडीची उब बाजूला ठेवत चर्चेत सहभागी झाले. यामुळे कोकणातील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे. या महाचर्चा सत्राने समाजाच्या नावाने स्वार्थ साधणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे, काही स्वार्थी संघटना चालकांचे, समाजाच्या नांवाने अर्थकारण करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. दिग्गज संघटनाना फेडरेशनचा प्रस्ताव घेऊन नियोजन समितीचे शिष्टमंडळ मनधरणी करणार आहे.

या महाचर्चात ग्रुप अडमिंन अनंत फिलसे, अविनाश लाड, अशोक वालम, रवींद्र मटकर, कृष्णा कोबनाक, प्रकाश तरळ, हेमंत रामाणे, सुनील माळी, महेश शिर्के, महेंद्र टिंगरे, मनोज घागरूम, प्रदीप मोगरे, नंदकुमार बेंद्रे, सुनील कवडे, विकास बटावले, दशरथ डांगरे, महेश गोठल, सूर्यकांत पागडे, अनिल गुळेकर, महेश पारदूले, अनिल काप, चंद्रकांत धोंडगे, सुनील जावळे, संदीप तांबट, मधुकर सोलकर, सुनील कानाल, महेंद्र मोरे, रघुनाथ कलबाटे, दयानंद चिंचवळकर, अमोल पवार, समीर पास्टे उपस्थित होते. 

अनेक कुणबी संघटना किमान समान कार्यक्रम तत्वावर समाजासाठी एकवटणे ही काळाची गरज आहे, राजकीय अस्तित्व, सामाजिक बदल, ओबीसी जनगणना, आरक्षण, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील समाज विषयासाठी सर्व संघटना एकत्र आणण्याचा हाच एकमेव उत्तम पर्याय आहे. 
- सुनील माळी, फेडरेशन नियोजन समिती सदस्य 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com