उधळपट्टीविना महोत्सवाला ग्लॅमर आणणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रत्नागिरी - ‘‘पालिकेच्या महोत्सवाला एक ग्लॅमर यावे यासाठी साधारण ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये कोणतीही उधळपट्टी नाही. जे कार्यक्रम आयोजित केले आहेत, त्यांना थेट धनादेशाने पैसे अदा होतील. त्यामुळे या महोत्सवामध्ये पारदर्शकता असणार आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि अनेकांना रोजगार मिळणार आहे. मांडवी महोत्सवाला १५ नव्हे; तर माझ्यासह सर्वांचा पाठिंबा आहे. राजू कीर महोत्सव करीत आहेत, त्याचा अभिमान आहे; पण पालिकेचा महोत्सव देखील एक आगळा-वेगळा महोत्सव ठरेल,’’ असा आत्मविश्‍वास नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला. 

पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, गटनेते बंड्या साळवी, अन्य नगरसेवक उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘पालिकेचा महोत्सव २८, २९, ३०, आणि १ मे असा होणार आहे. पर्यटकांसाठी जास्तीत जास्त आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी काही लोकांना येथील जलतरण तलावात प्रशिक्षण देऊन त्यानंतर समुद्रात एक ठिकाण निश्‍चित केले जाणार आहे. महोत्सवाच्या दृष्टीने आम्ही जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांचे आणि जनतेची सहकार्य मिळत आहे. पर्यटकांना माहिती देणारे केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच टोल फ्री क्रमांकदेखील देण्यात आला आहे. स्थानिक कलाकारांना यामध्ये संधी देण्यात येणार आहे. 

रंगऊर्जा या संस्थेचा कार्यक्रम आता दर शनिवार, रविवारी जिजामाता उद्यान येथे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोकणी लोककलांचाही अंतर्भाव आहे. महोत्सवाचा प्रसार आणि प्रचारासाठी सोळा लोकांची गाइड म्हणून टीम तयार केली आहे.’’

मांडवी किनाऱ्याची जनता ‘बॉस’
पालिकेचे पंधरा नव्हे; तर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक मांडवी पर्यटन महोत्सवाबरोबर आहे. राजू कीर करतात त्याचा सार्थ अभिमान आहे. श्री. कीर यांनी आधी १६,१७,१८ अशा तारखा असलेले पत्र दिले होते; परंतु त्यानंतर त्यांनी तारखांमध्ये बदल केला. दोन्ही महोत्सव वेगळे असण्याचे कारणच नाही. आम्ही एकत्रच महोत्सव करणार आहोत. मांडवी समुद्र किनाऱ्याची पालिका नव्हे, तर सर्व जनता बॉस आहे. त्यांना ३ लाखांचा निधी देण्याच्या सूचना आमदार उदय सामंत यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांना तो निधी देऊ,’’ असे श्री. पंडित यांनी स्पष्ट केले.

Web Title: The Festival of Municipals