मयेतील प्रसिद्ध माल्याच्या जत्रेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

आज जत्रेनिमित्त सकाळी केळबाय देवस्थानात धार्मिक विधी, दुपारी श्री रवळनाथ मंदिरातून भूतनाथ व रवळनाथ देवांची तरंगे सजवून ती वाजतगाजत केळबाय मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली

सिंधुदुर्ग - मये येथील श्री माया केळबाय पंचायतन आणि संलग्न देवस्थानच्या प्रसिद्ध माल्याच्या जत्रेस आज (सोमवार) सकाळपासून रितीरिवाजासह शानदार सुरवात झाली. ही जत्रा दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला गावचे आराध्य दैवत श्री महामाया (ब्राह्मणी) देवीच्या गावकरवाडा - मये येथील प्रांगणात होत असते.

आज जत्रेनिमित्त सकाळी केळबाय देवस्थानात धार्मिक विधी, दुपारी श्री रवळनाथ मंदिरातून भूतनाथ व रवळनाथ देवांची तरंगे सजवून ती वाजतगाजत केळबाय मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली. यावेळी या ठिकाणच्या पवित्र तळीत धोंड भक्तगणांनी स्नान केले व श्री केळबाय देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Festival starts in Maye