सलग पाचव्या दिवशी शेतकऱ्याचे अामरण उपोषण सुरुच

अमित गवळे 
रविवार, 2 डिसेंबर 2018

पाली : सुधागड तालुक्यातील भैरव येथील शेतकरी चिंतामन शंकर पवार हे अापल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या मागणीसाठी बुधवार (ता.२८) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्यांना योग्य व जलद न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील भैरव येथील शेतकरी चिंतामन शंकर पवार हे अापल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या मागणीसाठी बुधवार (ता.२८) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्यांना योग्य व जलद न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.

''पवार यांना न्याय मिळावा याकरीता रि.पा.ई चे कार्यकर्त्ये शनिवार (ता.१) पासून साखळी उपोषणास बसले आहेत. स्थानिक महसूल प्रशासनाकडून उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात असून विकासकाला पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. रि. पा. इंचे कार्यकर्ते रविंद्र महाडिक, संदिप गायकवाड, निशांत पवार, सुशिल गायकवाड, सुभाष मोते आदींनी साखळी उपोषणास बसेल अाहेत. माझ्यावर विकासकाकडून अन्याय झाला असून जलदगतीने न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार आहे. त्यास पुर्णतः स्थानिक प्रशासन जबाबदार राहिल.'' ,असे पवार यांनी सांगितले.

सुधागड तालुक्यातील दहिगाव हद्दीतील आवंढे या ठिकाणी पवार यांची मालकी हक्काची शेतजमीन आहे. या जागेच्या शेजारी विकसक पागूर देसाई यांनी जमीन विकत घेवून या ठिकाणी बंगले बांधून विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतू येथील आपल्या मालकी हक्काच्या २२ गुंठे जागेत संबधित विकसकाने अतिक्रमण करुन अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याचा आरोप चिंतामन पवार यांनी केला आहे. सरकारी सर्व्हेनुसार सदर जागेत अतिक्रमण झाले असल्याची कागदपत्रे समोर आले आहेत. तसेच महसूल अधिकार्‍यांकडे याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करुन देखील सबंधीतावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

विकासकावर अॅट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. त्यांना पाठिशी घालणार्‍या महसूल अधिकार्‍यांवर कारवाई करावी. सबंधीत विकासकाने जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवलेली (एन.ए) परवाणगी रद्द करावी केलेले. बांधकाम अनधिकृत असल्याचे घोषीत करावे आणि अनधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करावी. आदी, मागण्या पवार यांनी केल्या आहेत. यावेळी रि. पा. इं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, रविंद्रनाथ ओव्हाळ, प्रभाकर गायकवाड, भगवान शिंदे, आतिष सागळे, भिम महाडिक आदिंसह ग्रामस्त उपस्थित होते.

Web Title: For the fifth consecutive day, farmers Still the fasting strike