संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

File a sedition case against the insulting people of the Constitution
File a sedition case against the insulting people of the Constitution

महाड : दिल्ली येथे संविधान जाळल्याची घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर महाडमधील तमाम आंबेडकरी जनतेने संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन देखील प्रशासनाला आज देण्यात आले. गेली दोन दिवस दिल्ली येथील जंतरमंतरवर 9 ऑगस्ट क्रांतीदिनी काही लोकांनी एकत्रीत येऊन भारतीय संविधानाची प्रत जाळली. हे कृत्य करत असताना त्यांनी मनुवाद जिंदाबाद संविधान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. याबाबतची एक क्लीप सोशल मिडीयावर फिरली असता महाराष्ट्रात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे.

महाडमध्ये देखील तमाम आंबेडकरी नेत्यांनी एकत्रीत येत या घटनेचा निषेध केला. चवदारतळे येथे याबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दलितमित्र मधुकर गायकवाड, तुळशीराम जाधव, दलितमित्र मुकूंद पाटणे, विनायक हाटे, विश्वनाथ सोनावणे, राहुल साळवी, दिपक गायकवाड, लक्ष्मण जाधव, सखाराम सकपाळ, अनंत तांबे, अरूणा आजगावकर, उपस्थित होते. मधुकर गायकवाड यांनी ज्या संविधानाने देशातील विविध जाती धर्मांना एकत्रीत ठेवण्याचे काम केले त्या संविधानाचा अवमान करणे किंवा संविधान जाळणे हे देशद्रोही कृत्य असल्याचे सांगून अशा लोकांवर देशद्रोहाची कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगीतले. ही घटना केवळ एका जातीची नाही तर तमाम देशवासीयांची आहे यामुळे या घटनेचा आदर राखणे आपले सर्वांचेकर्तव्य आहे. अशा प्रकारे संविधानाचा अवमान होत असल्यास तमाम देशवासीयांनी एक होऊन या घटनेचा निषेध केला पाहीजे. महाडमध्ये सोमवारी याबाबत बहुजन समाजाची एकत्र बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com