रत्नागिरीत यामुळे झाला एक कोटीचा दंड वसूल...

fine of Rs 1 crore has been recovered from do not follow Ratnagiri rules
fine of Rs 1 crore has been recovered from do not follow Ratnagiri rules

रत्नागिरी :  टाळेबंदीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत नियम धाब्यावर बसविणार्‍यांना वाहतूक पोलिसांनी चांगलीच कायद्याची अद्दल घडविली आहे. विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 28 हजार 599 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्याच्याकडून तब्बल थोडा-थोडका नव्हे तर 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. यात विक्रमी दंड वसूल केला आहे तो विनाहेल्मेट वाहन चालविणार्‍यांवर. 13 हजार 154 स्वार असून त्याच्याकडून 65 लाखांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे. आता लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात विनाकारण गाड्या घेऊन नियम पायदळी तुडविणार्‍यांवर कडक कारवाई करत या वाहनचालकांना एक चांगली शिस्त लावली आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे जिल्ह्यात हेल्मेट वापरणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या वाढली आहे. जवळपास 95 टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हेल्मेट सक्ती यशस्वी झाल्याचं चित्र यातून दिसत आहे. तसेच नियम मोडणार्‍या वाहनचालकांकडून विक्रमी दंडही वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिस ; हेल्मेट नसणारेच जास्त


लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरू नका, असं आवाहन वारंवार करण्यात येत होते. या कालवधीत फक्त अत्यावश्यक सेवेला सुट देण्यात आली होती. मात्र तरीही बाईक किंवा चारचाकी गाडी घेऊन काहीजण मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताना दिसत होते. सुरवातीला कारवाईचा इशारा दिला. तरी ऐकत नसल्याने नियमांवर बोट ठेवत वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न घालणे किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे नियम मोडणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली.

 नियम न पाळणार्‍यांकडून एक कोटीचा दंड वसूल

या दोन महिन्यांत पोलिसांनी 28 हजार 599 वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल केला. मात्र यामध्ये सर्वांत जास्त कारवाई विना  हेल्मेट फिरणार्‍यांवर केली. अशा तब्बल 13 हजार 154 स्वारांकडून 65 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने नियमांचे पालन होऊ लागले आहे. शिवाय हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या देखील 95 टक्के झाली आहे, असे जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com