देवरुखातील जिल्हा परिषद शाळेत आगीची घटना

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

साडवली - देवरुख मधील जिल्हा परिषद देवरुख शाळा नं. २ मध्ये शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार घडला. या आगीत सुमारे लाखो रुपयांची हानी झाली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेच्या मैदानावर बीट स्तरावरच्या शालेय क्रीडा स्पर्धा सकाळपासुन सुरु होत्या. यावेळी  मुलांना शाळेच्या खोलीतून धूर येताना दिसला. त्यांनी आरडा ओरडा केल्याने शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

या आगीत शाळेची चाळीस बाक, क्रीडासाहित्य, भांडी, टिव्ही, शोकेस, ग्रथालयातील पुस्तके, विज्ञान पेटी, गणित पेटी, शिलाई मशिन, वाॅटर प्युरीफायर आदी साहित्य या आगीत जळाले. पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपंचायत, महावितरण, पोलीस आदींनी शाळा नं.२ ला भेट देवून पंचनामा केला.

Web Title: fire in Devrukh ZP School