मंडणगड किल्ल्याला वणव्याचे ग्रहण

मंडणगड किल्ल्याला वणव्याचे ग्रहण

मंडणगड - प्रतिवर्षी मंडणगड किल्ल्याला लागणार्‍या वणव्यामुळे येथील जैवविविधता, वनसंपदा नष्ट झाली आहे. दुर्मिळ पक्षी, जंगली प्राणी दिसेनासे झाले आहेत. हा वणवा मानव निर्मित असल्याची चर्चा आहे. स्थानिकांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणारी गडावरील पुरातन अवशेष, बुरुज, तटबंदी, जुने वाडे, धान्याची कोठार, निसर्गरम्य स्थळे भकास अवशेष कवटाळून बसली आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यामुळे किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. 

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत या परिसरात वणवा पेटतो. सोमवारी (ता. 4) दुपारी साडेबाराच्या सुमारास किल्ला परिसरात आगीचे डोंब उसळले. वणव्याने किल्ल्याला वेढा घातला. त्यात सर्व जळून खाक झाले. हा वणवा पाले, तुळशी, माहु, कोंझर, मंडणगड परिसरात पसरला. सुमारे पंधरा तास हा वणवा भडकत होता. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र जळून गेले. 

मंडणगड किल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने पर्यटन विकासाची गाडी केवळ चर्चेच्या गुर्‍हाळ्यात अडकली आहे. पुरेशा सोयीसुविधाअभावी अद्याप म्हणावा तसा पर्यटकांचा ओघ सुरू झालेला नाही. किल्यावर वस्ती करणे हा एक साहसी अनुभव आहे. किल्यावर दोन तळी, एक मंदिर, दर्गा, नामशेष तटबंदी व एक तोफ आहे. 

किल्ला परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. वणव्यात त्यांचे अधिवास जळून जात असल्याने दुर्मिळ वन्यजीव नामशेष होवू लागले आहेत. यावर त्वरित प्रतिबंधक कारवाई व्हायला हवी.

- समीर पारधी, प्रगतिशील शेतकरी, तुळशी

मंडणगड किल्ला पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. किल्ल्यावरील वैभव संरक्षित करून पर्यटकांपर्यंत पोहचणे गरजेचे असून त्यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे.

- विजय ऐनेकर, पर्यावरणप्रेमी, मंडणगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com