मोबाईल शॉपी जळून 9 लाखांची नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

देवगड- येथील बाजारपेठेमधील एका मोबाईल शॉपीला आग लागून आतील फर्निचरसह अन्य साहित्य खाक झाले आहे. यामध्ये सुमारे 9 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल (ता.10) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. 

येथील बसस्थानकाजवळ असलेल्या अनुसया कॉम्प्लेक्‍समधील गाळ्यात एक मोबाईल शॉपी आहे. शॉपी चालवणारे संदीप यादव (रा. श्रीकृष्णनगर, जामसंडे) काल रात्री नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास शॉपीतून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिस यंत्रणा, आसपासच्या नागरिकांसह श्री. यादव यांना दिली. आगीची बातमी कळताच अनेकजण तातडीने जमा झाले. सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानातील साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, गुरूनाथ परब, कॉंस्टेबल नितीन शेटये, मिलिंद परब, दादा परब, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. 

शॉपीमधील विविध कंपन्यांचे हॅंडसेट, मोर्बाइलसाठी लागणारे विविध सुटे भाग, दुरूस्ती यंत्रणा, फर्निचर तसेच अन्य साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीमध्ये सुमारे नऊ लाखाची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, कॉंस्टेबल सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुकान गाळ्यामध्ये असल्याने तसेच समोर लोखंडी शटर असल्याने आग आसपासच्या दुकानामध्ये पसरली नाही; मात्र आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य खाक झाले. व्यापाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. 
 
Web Title: Fire inside mobile shop