क्षणात झाले होत्याचे नव्हते ; भडकलेल्या वणव्यात होरपळाल्या काजूच्या बागा

fire in keshav garden in konkan sawantwadi sindhudurg damage rupees lakh
fire in keshav garden in konkan sawantwadi sindhudurg damage rupees lakh

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सोनुर्ली-निरवडे हद्दीवर असलेल्या गावठाण परिसरातील जंगल भागात वणवा पेटल्याने गावठी तसेच कलमी काजू झाडे जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. काल (ता.9) दुपारी लागलेला हा वणवा दुसऱ्या दिवशीही धगधगत होता. जिल्ह्यामध्ये सध्या वणवा पेटण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. यामध्ये ऐन हंगामात हातातोंडाशी आलेले पीक आगीत भस्मसात झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

सोनुर्ली-निरवडे येथील शेतकऱ्यांची गावठी काजू गावठाण परिसरामध्ये असलेल्या डोंगरावर आहेत. दरवर्षी या काजूपासून मोठे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. यातून घरचा आर्थिक कारभार शेतकरी चालवतात. सध्या थंडीचा हंगाम सुरू असल्याने काजू झाडाला चांगल्याप्रकारे मोहर येऊन फळधारणा झाली होती. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल व त्यातून आर्थिक फायदा होईल, या आशेवर येथील शेतकरी होता; मात्र क्षणात होत्याचे नव्हते होऊन भडकलेल्या वणव्यात सर्व काजू झाडे होरपळून गेली. तब्बल दहा ते पंधरा एकर जागेतील काजू झाडे जळून खाक झाली. 

दरवर्षीची समस्या 

पेटलेला वणवा शमवण्यासाठी निरवडे तसेच सोनुर्ली भागातील शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यामुळे काही अंशी भाग या आगीतून वाचल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या नुकसान टळले. 50 ते 60 माणसांनी हा वणवा शमवण्यासाठी घागर, कळशांमधून पाणी आणून अतोनात प्रयत्न केला; मात्र त्याचे हे प्रयत्न काहीसे तोकडेच पडले. दरवर्षी या भागातील काजू झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतात. दरवर्षी शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. ही काजू झाडे रस्त्यापासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे येणारे-जाणारे वाहन चालक सिगारेट, विडी पेटवून टाकल्याने हा वणवा पेटतो.  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com