कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मंडणगड - तालुक्‍यातील डोंगरमाथ्यावर असणारा संपूर्ण परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले आहे. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशुधन पोसतं. एवढंच काय येथील चाऱ्यावर इतर भागातील जनावरांचीही भूक भागते; परंतु या परिसराला आता विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून, वणवे लावून गवताच्या कुरणाची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहेत. 

तालुक्‍यातील अनेक भागात शेतीबरोबर पशुपालन केले जाते. येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करतात; मात्र सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे या भागातील जनावरांना आवश्‍यक चारा नष्ट होत आहे. परिसरात वणवे लावल्यामुळे कित्येक वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळू लागले आहेत. पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होत आहेत. त्यासाठी वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. 

Web Title: fire in madangad forest