रत्नागिरी: बाजारपेठेतील चार दुकाने आगीत भस्मसात

राजेश शेळके 
शनिवार, 7 जुलै 2018

मुख्य बाजारपेठेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस चौकीतील पोलिस कर्मचार्‍याच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संबंधितांचे फोन घेऊन त्यांना आगीबाबची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यासाठी मदतकार्य केले.

रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोखल नाका येथे चार दुकाने आगीत भस्मसात झाली. काल (ता. 6) रात्री दीड वाजता ही घटना घडली. चार तास आग विझविण्यासाठी पालिका आणि फिनोलेक्सच्या अग्निशमन दलाला शर्थिचे प्रयत्न करावे लागले. पहाटे पाच वाजता ही आग आटोक्यात आली. यामध्ये तिन्ही दुकानांचे लाखोचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.  

मुख्य बाजारपेठेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस चौकीतील पोलिस कर्मचार्‍याच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संबंधितांचे फोन घेऊन त्यांना आगीबाबची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. मात्र आगीन ऋद्रावतार धारण केल्याने त्यावर नियंत्रण मिळविताना नाकी नऊ आले. पालिकेचे एक दोन नव्हे तर चार बंब मागवावे लागले. चार सात आग विझविण्यासाठीची कसरत सुरू होती.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामध्ये श्री. संसारे यांचे हनुमान कोल्ड्रिंक्स, श्री. गांधी यांचे चणा दुकान, श्री. वणजू यांचे विडी दुकान आणि श्री. कोलते यांचे कोलते पान शॉपचा समावेश आहे. चारही दुकाने आगीमध्ये भस्मसात झाली. यात लाखोचे नुकसान झाले. दुपारपर्यंत या जळीताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.  शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येते. पालिकेचे फायरमन मोहन कदम, राजेंद्र घोसाळे, यशवंत शेलार, हरिश मोहित, श्री. गजने, श्री. शिंदे तर ड्रायव्हर बाबू चंदावाले, श्री. सुर्वे यांच्यासह स्थानिकांनी आग विजविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले.

Web Title: fire on shops in Ratnagiri

टॅग्स