अनधिकृत बांधकामच्या वादातून जानवली येथे फायरिंग 

अनधिकृत बांधकामच्या वादातून जानवली येथे फायरिंग 

कणकवली - जानवली येथील आदर्शनगरमधील इमारतीच्या खुल्या जागेत अनअधिकृत बांधकाम केल्यावरून वाद होता. याच वादातून रिऑल्व्हरने फायरिंग केल्याची घटना आज सकाळी घडली.

मुंबई -गोवा महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. बांधकाम व्यावसायिक सुभाष भोसले यांनी त्या इमारतीत राहणारे किशोर दाभोळकर यांच्यावर रिऑल्व्हरने फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. दाभोळकर हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी साकेडी फाटा येथे एकटेच गेले होते तेव्हा हा प्रकार घडला. त्या निवासी संकुलनाचा वाद गेली काही वर्षे सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणावरून गेले काही महिने दाभोळकर आणि भोसले यांच्यात धुसपूस सुरू होती. आज सकाळच्या घटनेनंतर पोलिसांनी भोसलेंच्या घराची झडती घेवून पंचनामा सुरू केला आहे. गुन्हा दाखल काम उशिरापर्यंत सुरू होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com