देवगड हापूसच्या पहिल्या पेटीला ७००० रुपये दर

अनंत पाताडे
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

देवगड - हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.  देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ती पाठवली. या पहिल्या हापूस पेटीला 7000 हजार इतका दर मिळाला.

गेले दोन वर्षे प्रकाश शिरसेकर वाशी मार्केटला पेटी पाठवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातील हापूस मुंबईत दाखल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे देवगडला हा मान मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगड मधील संजय बाणे आणि प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतील आंबा मुंबईला रवाना झाला. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याला जुलैमध्येच मोहर आला होता. या मोहराचे व्यवस्थित संगोपन केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार आंबा घेणे त्यांना शक्य झाले.

Web Title: first box of Devagad Hapusa is priced at Rs. 7000

टॅग्स