पहिले लक्‍झरी आंग्रिया क्रूझ १२ ऑक्‍टोबरपासून

पहिले लक्‍झरी आंग्रिया क्रूझ १२ ऑक्‍टोबरपासून

रत्नागिरी - देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या लक्‍झरी आंग्रिया क्रूझ सेवेचा प्रारंभ १२ ऑक्‍टोबरला सायंकाळी ५ वाजता मुंबईत नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल,तेव्हा बोट वाहतूक विषयातील नवे पर्व सुरू होईल. या क्रूझमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रात चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार निर्माण होईल.

या क्रूझमध्ये स्विमिंग पूल, स्पा, जीम, बार, रेस्टॉरंट आदी सोयी आहेत.साधारणतः मुंबई- गोवा प्रवासात १५ तास लागतील. क्रूझची क्षमता ५०० पॅसेंजरची आहे. कॅप्टन नितिन धोंड यांच्या नेतृत्वाखाली आँग्रिया क्रूझ मार्गस्थ होत आहे.सध्या क्रूझ मुंबई- गोवा- मुंबई अशी सेवा देणार आहे. परंतु कोकणातील रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आदी महत्त्वाच्या बंदरावर क्रूझचा थांबा मिळण्यासाठी ॲड. विलास पाटणे प्रथमपासून प्रयत्नशील आहेत.

साधारणपणे आपली बंदर मालाचा चढ-उतार भरण्याकरीता तयार केली जातात. यास्तव नितीन गडकरी यांनी कोकणातील महत्त्वाच्या बंदरावर जलवाहतूक मंत्रालयाला क्रूझ टर्मिनल उभारण्याचे आदेश दिले आहेत. कोकणात गुंतवणूकदार पुढे येत नसल्याने बोट खरेदीसाठी केंद्राचे शिपिंग कॉर्पोरेशनने ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

क्रूझ पर्यटन वाढीच्या दृष्टीने जगभर समुद्राचे मार्केिटंग केले जात आहे. कोकणातील सुंदर समुद्रकिनारा, निसर्ग ही आपली जमेची बाजू आहे. क्रूझमुळे पर्यटन क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध होतील. मुंबईत दोन फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू करण्यात येत आहेत.
- ॲड. विलास पाटणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com