मच्छी-मटण मार्केटमध्ये लोक डब्बे व कापडी पिशव्या घेवून दाखल

अमित गवळे
रविवार, 24 जून 2018

पाली : राज्यात शनिवारी (ता.२३) सर्वत्र प्लास्टिक बंदिचा निर्णयाला प्रारंभ झाला. मात्र प्लास्टिक बंदिची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहण्यासाठी रविवार महत्वाचा होता. पाली मच्छी व मटण मार्केटमध्ये सकाळपासूनच अनेक जण कापडी पिशव्या व डब्बे घेवून येतांना दिसले.

पाली : राज्यात शनिवारी (ता.२३) सर्वत्र प्लास्टिक बंदिचा निर्णयाला प्रारंभ झाला. मात्र प्लास्टिक बंदिची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहण्यासाठी रविवार महत्वाचा होता. पाली मच्छी व मटण मार्केटमध्ये सकाळपासूनच अनेक जण कापडी पिशव्या व डब्बे घेवून येतांना दिसले.

अनेक वर्षांपासून प्लस्टिकच्या पिशवीत चिकन, मटन व मच्छी घेण्याची सवय असलेले नागरीक देखिल रविवारी हातात कापडी पिशवी घेवूनबाजारात अाले. अनेकांनी पुर्वी कसे डब्बे व कापडी पिशव्या घेवून यायचो त्या जुन्या अाठवणी सांगितल्या. बाजारातील प्रत्येक विक्रेत्यांनी कापडी पिशव्यांचा स्टाॅक भरुन ठेवला आहे. एखादा ग्राहक एैकलाच नाही तर नाईलाजाने त्यांना कुठून तरी प्लास्टिक पिशवी काढून द्यावी लागली. कारण हा ग्राहक मग मटण-मच्छी न घेता दुसरीकडे जात होता. 

कापडी पिशव्या घाऊक दराने विकणारे विक्रेते देखिल मार्केट मध्ये बसले होते.अादिवासी वाड्यापाड्यावर अजुन प्लास्टिक बंदिच्या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांना हि बाब अनेक विक्रेत्यांना समजावी लागली असे हेमंत राऊत या चिकन विक्रेत्याने सकाळला सांगितले. घाऊक बाजारात छोटी कापडी पांढरी पिशवी दिड रुपयात तर तशीच लाल पिशवी पावणे दोन रुपयांना मिळते.काही विक्रेते या पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसा घेतात तर काही नाही. अापल्यावर कुठूनही दंडाची कारवाई होऊ नये यासाठी विक्रेते व दुकानदारांनी अाधीच खबरदारी घेतली आहे. सुज्ञ ग्राहकांनी देखिल या निर्णयाचे स्वागत केले.

पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी हा निर्णय चांगला आहे. याची अंमलबजावणी प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहीजे. थोडे प्रयत्न व जनजागृती केल्यास प्लास्टिक पासून सहज मुक्ती मिळू शकले.
- जीवन साजेकर, ग्राहक, पाली

प्लास्टिक मुक्तीचा निर्णय अाधीच झाला होता. त्यामुळे यासाठी तयार होतो. कापडी पिशव्यांतून ग्राहकांना चिकन देतो. चिकन, मच्छी व मटन नेण्यासाठी लोक स्वतःहुन कापडी पिशव्या व डबे अाणत आहेत. मात्र या गोष्टी नेण्यासाठी चांगल्या पर्यावरण स्नेही पर्यायाची गरज आहे
- हेमंत राऊत, चिकन विक्रेते, पाली

 

Web Title: In the fish market, people have to take their bags and handbags