मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार  - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मंडणगड - ""राज्य शासनाने रत्नागिरी जिल्ह्याला खेकडा संवर्धनाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केले आहे. येथे खेकडा संवर्धनाला चालना देण्याबरोबर मत्स्यबीज उत्पादन केंद्र निर्माण करून सागरी उत्पादनाद्वारे युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मत्स्यबीजासांठी अन्य राज्यात करावी लागणारी वणवण आगामी काळात बंद होईल'', असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी येथे केले. 

लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास त्यांनी आज भेट दिली. यावेळच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मंत्री झाल्यापासून दुधाच्या दरात सहा रुपयांची प्रथमच वाढ केली. दुग्ध उत्पादनात देशात सहाव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरता आरएफओ चिप गाईच्या शरीरात सोडून गाय कोठून आली, कोठे गेली, किती दुध दिले याबाबत प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर करून इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पशुसंवर्धन खात्याकडून 349 मोबाइल व्हॅऩ उपलब्ध करणार आहोत. शेतक-याने केवळ एक एसएमएस केल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ऑपरेशनेची सुविधा असलेले वाहन अगदी डोंगराळ भागात जाऊन संबंधित प्राण्यावर उपचार करतील. 

राज्यात ओबीसी स्वतंत्र मंत्रालय स्थापल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. पशुसंवर्धन विभागातर्फे नवी मुंबई-कळंबोली येथे 2200 कोटी रुपये खर्चाचे ऍनिमल केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच उपक्रम आहे. यासाठी रतन टाटा सी.आर.एस फंडातून निधी मिळाला आहे. आवश्‍यक ती जमीन पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून दिली. 

Web Title: Fish seed production centers will be set up