esakal | मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

fish traders ignored anaculture in ratnagiri

फक्त पावणेचार लाखांच्या महसुलावर समाधान 

मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरविली. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे ८ लाखांचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. यंदा फक्त २३ तलावांचा लिलाव होऊन पावणेचार लाखांच्या महसुलावर मत्स्य खात्याला समाधान मानावे लागले आहे. 

हेही वाचा - श्रावणधारांचा अनुभव! प्रचंड वेगवान वारे, मच्छीमारी नौका बंदराकडे...

मत्स्यबीज तयार न होणे, तलावात सूक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणीचा अभाव आणि मासे पकडण्यासाठी कामगार न मिळणे अशा अनेक अडचणींमुळे गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होती. त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्‍टरी ३०० रुपये याप्रमाणे तलावाचा लिलाव होतो.

सुमारे १०० ते १२० हेक्‍टरचे तलाव आहेत. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक त्यामध्ये माशाचे बीज सोडतात; मात्र बहुतेक तलाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दऱ्या-खोऱ्यातील पाणी वाहत राहते. त्यामुळे तलाव भरून उलटून वाहत राहतात. त्यामुळे बहुतांशी पिल्ली वाहून जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्‍यक असणारे सूक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खाऱ्या पाण्यातील माशांप्रमाणे चव नसते.

हेही वाचा -  सामान्यांपासून श्रीमंतही बाधित, 20 जणांचा मृत्यू, कुठली ही स्थिती? 

"जिल्ह्यात तलावातील मत्स्य शेतीला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी तरुण व्यावसायिकांनी वेगळा प्रयोग करावा."

- एम. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य संचालक, रत्नागिरी

संपादन -  स्नेहल कदम 

loading image
go to top