पारंपरिक मच्छीमारीला कृषीचा दर्जा द्या; केंद्राकडे मागणी

कोळी महासंघाची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी; धोरण ठरविण्याचे आश्वासन
Traditional Fisherman Aggressive In Ratnagiri Kokan Marathi News
Traditional Fisherman Aggressive In Ratnagiri Kokan Marathi News

दाभोळ (रत्नागिरी) : महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि पारंपरिक मच्छीमारी (Traditional fishing) व्यवसायाला कृषीचा (Agriculture) दर्जा देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendrasingh Tomar) यांच्याकडे कोळी महासंघाने केली. पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा नसल्याने कृषी मंत्रालयाने वेळोवेळी घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांपासून मच्छीमारांना वंचित राहावे लागते. म्हणून शेतकी व्यवसायाला मिळणाऱ्या सुविधा पारंपरिक मासेमारांना ही मिळायला हव्यात. यासाठी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची, कृषी भवन येथील दालनामध्ये भेट घेतली. तोमर यांनी याबाबत प्रशासकीय अहवाल मागवून धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले.

Summary

कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची, कृषी भवन येथील दालनामध्ये भेट घेतली.

कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही मच्छीमारांच्या रास्त मागण्यांची शिफारस मंत्री महोदयांकडे केली. कृषी अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, थकित कर्जमाफी योजना अथवा कृषी अंतर्गत खत, बियाणे, विमा योजना आणि हमीभावसारख्या योजनांपासून मच्छीमार नेहमी वंचित राहात असल्यानेच मासेमारांना कृषीचा दर्जा देण्याची मागणी करीत असल्याचे रमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी युतीचे शासन असताना केंद्राकडे केलेल्या शिफारशींचा उल्लेख करून या सुविधा पारंपरिक आणि गरीब मच्छीमारांना मिळायलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या प्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपा महाराष्ट्र मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर आदी उपस्थित होते.

Traditional Fisherman Aggressive In Ratnagiri Kokan Marathi News
सावधान! ऑनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्यांची होतेय फसवणूक

थकीत कर्ज माफ करणेही शक्य...

पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा दिल्याने गरीब मच्छीमारांची थकीत कर्ज माफ करणे अथवा आपद्ग्रस्त मच्छीमारांचे पुनर्वसन करणे, मच्छीमारांना आयकरातील सवलत मिळणे शक्य होणार असल्याचे मत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मांडले.

आढावा घेऊन निर्णय : तोमर

पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा देणे, बाबतचा निर्णय आपण केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याशी चर्चा करून प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन नरेंद्रसिंग तोमर यांनी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाला त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com