सहायक मत्स्य आयुक्तांना छोट्या मच्छीमारांचा घेराव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

रत्नागिरी : येथील किनारी भागात मिनी पर्सिन नेट नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात छोट्या मच्छीमारांनी आज सहायक मत्स्य आयुक्‍तांना घेराव घातला. दोन दिवसांत मिनी पर्सिन नेट नौकांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा इशारा राजिवडा, साखरतर येथील मच्छीमारांनी दिला आहे.

मिनी पर्सिन नेट नौका किनारी भागात येऊन मासेमारी करत असल्याचे पुढे आले आहे; मात्र याकडे अधिकाऱ्यांनी त्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. राजिवडा, मिरकरवाडा, साखरतर येथील बंदरात अनेक मिनी पर्सिन नेट नौका उभ्या असतात. त्यांच्यावर नंबरच नाही. मत्स्य विभागाकडून त्या नौकांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे; परंतु कारवाई केली जात नाही. शासनाने ज्या उद्देशाने बंदी कालावधी आणि बंदी क्षेत्र जाहीर केले, त्याचा फायदा या वर्षीच्या सुरवातीच्या हंगामात झाला; परंतु त्यानंतर पर्ससिननेट आणि मिनी पर्ससिसनेट मासेमारी किनाऱ्यालगत सुरू झाल्याने छोट्या मच्छीमारांची पूर्ण निराशा होऊ लागली आहे.

आज साखरतर, राजिवडा येथील मच्छीमारांनी सहायक मत्स्य अधिकारी भादुले यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे मच्छीमारांच्या समस्या मांडल्या. भादुले यांनीही मत्स्य विभागाच्या अडचणी मच्छीमारांपुढे मांडत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: fishermen gherao to fishing commissioner