समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने खवय्यांना गोडया पाण्यातील माशांची मेजवानी

अमित गवळे
शुक्रवार, 22 जून 2018

नदी किनारी, ओहळ, वाहते धबधबे तसेच शेतात अाणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या तसेच मुठे सध्या मुबलक मिळत आहेत.

पाली (जि. रायगड) - पावासाळा सुरु झाल्याने समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी खवय्यांच्या उड्या अाता गोड्या पाण्यातील मासे तसेच गोड्या चिंबोऱ्यांवर पडत आहेत. हे मासे व चिंबोऱ्या सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.

नदी किनारी, ओहळ, वाहते धबधबे तसेच शेतात अाणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या तसेच मुठे सध्या मुबलक मिळत आहेत. पौष्टिक अाणि चविष्ट अशा या चिंबोऱ्या व मुठे खवय्ये चविने खातात. तसेच नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात तसेच खाडीत सापडणाऱ्या माशांची आवक देखील वाढली आहे. 

pali raigad

त्यामध्ये मळे, शिवडा, अरलय, वाम, कोलंबी, मंगरुळ, शिंगटी, चिवण्या, खवल अादी माशांचा समावेश आहे. या मोसमात सापडणाऱ्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी सापडतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळी वाले मासे म्हणतात. ही गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे व चिंबोर्या पकडतात. हे विकुन त्यांच्या हाती चार पैसे मिळतात.

उधवण किंवा वलगणीच्या माशांना मागणी - सलग दोन चार दिवस जोरदार पाऊसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यावेळी अालेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झूंबड उडते. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात.

वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशांमध्ये हमखास अंडी असतात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. दरवर्षी वलगणीचे मासे पकडतो. त्यासाठी जाळे, पाग, लोखंडी तलवार अादी साधनांचा वापर करतो. - किरण करकरे, तरूण मासेमार, नवघर-लोणेरे

pali raigad

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The fishing in the sea is closed in kokan