कुडाळात २६ ला फिटनेस जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

कुडाळ - ‘एक पाऊल आपल्या निरोगी आयुष्याकडे’ हे ब्रीद घेऊन ‘समझ’ फिटनेस उपक्रमांतर्गत एलएमआयबीच्यावतीने २६ ला फिटनेस जनजागृतीचे आयोजन कुडाळ हायस्कूल येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला योगपावरचे तज्ज्ञ येणार आहेत. ही माहिती प्रकल्प व्यवस्थापक निकेत खानोलकर, सिद्धेश सावंत यांनी दिली. या जनजागृतीमध्ये ‘सकाळ’चाही सहभाग आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम ही काळाजी गरज बनली आहे. याबाबत सिंधुदुर्गात जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने एलएमआयबीने फिटनेस ॲक्‍टिव्हिटीचे पाऊल टाकले आहे. याबाबत माहिती देताना खानोलकर म्हणाले, ‘‘समझ उपक्रमांतर्गत २०१६ मध्ये रायपूर येथे फिटनेसबाबत जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 

रायपूरसह इंदौर या ठिकाणीसुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला. सिंधुदुर्गात शहरी भागासह ग्रामीण भागातही व्यायामाबाबत जनजागृती व्हावी, सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे या उद्देशाने २६ ला सकाळी कुडाळ हायस्कूल येथे या उपक्रमाला सुरवात होणार आहे. या वेळी योगपावर मुंबईचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यायामासाठी अरविंद सिल्वा मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. याबाबत सिंधुदुर्गात शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज, स्पोर्ट क्‍लब, बॅंका, डॉक्‍टर्स, शासकीय, निमशासकीय कार्यालये या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ ला सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत फिटनेसबाबत मार्गदर्शन, साडेसात ते आठ व्यायाम, तसेच आठ ते दहा या वेळेत मिनी मॅरेथॉन होणार आहे. ही मॅरेथॉन कुडाळ हायस्कूल एमआयडीसी व परत कुडाळ अशी असेल. ज्यांना ऑनलाइन प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी www.sportzeel.com वर जाऊन प्रवेश घ्यावा.’’

Web Title: fitness publicity in kudal