नोकरीच्या प्रलोभनाने पाच लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पेण - डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून चार लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रतीक मोकल याच्याविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गोदावरीनगरचा (चिंचपाडा, पेण) रहिवासी आहे. 

पेण - डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून चार लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रतीक मोकल याच्याविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गोदावरीनगरचा (चिंचपाडा, पेण) रहिवासी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडखळ येथे संजय रामकृष्ण म्हात्रे यांचे औदुंबर इंजिनियर वर्कशॉप आहे. आरोपी प्रतीक हा येथे अनेकदा कामानिमित्त येत असे. आपण जेएसडब्ल्यू कंपनीचे कर्मचारी असून मॅनेजमेंटशी आपले चांगले संबंध असल्याची बतावणी तो करायचा. आपण तेथे नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगायचा. त्याच्यावर विश्‍वास ठेवून म्हात्रे यांनी आपली बहीण कविता हिच्या नोकरीसाठी प्रतीकशी बोलणे केले. तीन महिन्यांत नोकरी देतो; पण पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्याने इतर दोन लोकांची नेमणूकपत्रे दाखविली. म्हात्रे यांनी त्याला डिसेंबर २०१५ मध्ये ९५ हजार रुपये दिले. चार महिने उलटल्यावर प्रतीकने म्हात्रे यांना कंपनीचे बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यानंतर त्याने म्हात्रे यांच्याकडून टप्प्पाटप्प्याने ३५ हजार, ३ लाख पाच हजार व ५६ हजार ६०० रुपये असे ४ लाख ९१ हजार ६०० रुपये उकळल्याचा आरोप आहे. 

नियुक्तिपत्र बोगस  
बहिणीच्या नोकरीबाबत संजय म्हात्रे यांनी जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडे चौकशी केली असता, कंपनीने असे कोणतेही नियुक्तिपत्र दिले नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. याप्रकरणी कंपनी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वडखळ पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर म्हात्रे यांनी प्रतीकच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: Five lakhs Fraud