धक्कादायक: पाच वर्षात 1309 महिला बेपत्ता

राजेश शेळके
Wednesday, 2 December 2020

जिल्ह्याची स्थिती; तपास मागे पडल्याने अनेकांचा नाही थांगपत्ता

रत्नागिरी : महिला, तरुणींवर अत्याचार होणाच्या गंभीर घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालात हे नमुद करण्यात आले आहे. याच महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 1 हजार 309 महिला, तरूणी बेपत्ता  झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यापैकी 144 महिला अजूनही गायब आहेत. या महिला नेमक्या कुठे आहेत, त्यांचे काय झाले, हे पोलिस तपास मागे पडल्याने त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. बेपत्तांमध्ये विवाहित महिलांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा- जा बाबा! तुझ्या पाया पडतो! माजी सरपंचानी केली विनवणी -

जिल्हा पोलिस दलाकडुन ही अधिकृत माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या महिलांच्या शोधासाठीजिल्हा पोलिस दलामार्फत विशेष अभियान राबविण्याची गरज आहे. देशासह राज्यात महिला अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोने फेब्रुवारी महिन्यात आपला अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये देशात सर्वाधिक महिला महाराष्ट्र राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. त्यातिल शेकडो महिलांचा अद्यापही बेपत्ताच आहेत. महाराष्ट्रात 2016 मध्ये 24 हजार 937 मुली, महिला बेपत्ता झाल्या. 2017 ला 28 हजार 133 , तर 2018 ला 31 हजार 299 महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातिल अनेक महिला अद्यापहि बेपत्ता आहेत.

राज्याबरोबर जिल्ह्यातही महिला, तरूणी बेपत्ता होण्याचे गंभीर आणि चिंताजणक आहे. 2016 ते 2020 या पाच वर्षाच्या कालावधीत 1 हजार 309 महिला, मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.  त्यातिल 144 महिला अद्यापही बेपत्ता आहेत. पोलिस ठाण्यातून केवळ महिला बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल आहे. परंतु बेपत्ता झालेल्या महिला कुठे गेल्या, त्यांचे काय झाले याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. घरातील महिला, तरूणी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांमार्फत नजिकच्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जातात. सुरवातीला काही दिवस बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडुन शोध घेतला जातो. परंतु त्यानंतर त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे त्या महिला नेमक्या गेल्या कुठे, याचा शोध घेण्यात पोलिसांना यश येते. त्यामुळे बेपत्तांच्या शोधासाठी विशेष मोहिम आखण्याची गरज आहे.
 

साल        बेपत्ता झालेल्या महिला     अद्याप बेपत्ता
2016 -       207                       13
2017 -       266                       18
2018 -       317                       13
2019 -       329                       33
2020 -       190                       37  

एकुण अद्याप बेपत्ता                          144

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In five years 1309 woman missing ratnagiri