भारजा नदीला पूर; या गावात शेकडो एकर भातशेती पाण्यात 

Flood To Bharaj River Hundred Acres Paddy Field Under Water
Flood To Bharaj River Hundred Acres Paddy Field Under Water

मंडणगड ( रत्नागिरी ) - वादळी पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले असून, जनजीवन पूर्णतः विस्कळित केले आहे. भारजा नदीला आलेल्या पुरात चिंचघर मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने तो दिसेनासा झाला असून, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच चिंचघर, शेवरे परिसरातील शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्यात गायब झाली आहे. 

तालुक्‍यात सरासरी 229 मिमी पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली. मंडणगड 228 मिमी, म्हाप्रळ 180 मिमी, देव्हारे 280 मिमी असा तीन मोजणी केंद्रात एका दिवसांत एकूण 688 मिमी पाऊस झाला. 6 ऑगस्ट सकाळपर्यंत एकूण 2394 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारजा नदी पात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ पुराला कारणीभूत ठरत आहे. तसेच समुद्राला भरती येत असल्याने खाडीतून पाणी पुराचा केंद्रबिंदू ठरलेल्या चिंचघर परिसराच्या दिशेने सरकते.

शेकडो एकर लावणी केलेली भातशेती तीन दिवसांपासून पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे लावणी केलेली रोपे कुजण्याची शक्‍यता आहे. शेताच्या बांधावरून पाणी गेल्याने अनेक बांध फुटून नुकसान झाले आहे. वाहून आलेल्या गाळाने, कचरा यामुळे शेकडो एकर जमीन नापिक बनत आहे. दरवर्षीच्या अशा नुकसानामुळे पडीक क्षेत्र वाढत आहे. 

शेवरे, चिंचघर परिसरात भारजा नदी प्रचंड पाण्यामुळे आपले पात्र सोडून वाहू लागले की, त्यामुळे हा परिसर पाण्याखाली जातो. येथे नदीचा प्रवाह संथ गतीने वाहतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहत आलेला गाळ येथील पात्रात स्थिरावत खाली बसतो. वर्षानुवर्षे भारजा नदी बारमाही वाहत असून, तिने वाहून आणलेला गाळ या नदीपात्रात साचला आहे. परिणामी भारजा बुजून गेली आहे. त्यामुळे प्रचंड वाहून येणारे पाणी पात्र सोडून अन्यत्र प्रवाहित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com