मालवणात 29 पासून खाद्य महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मालवण - येथील किनारपट्टीवर सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दांडी किनाऱ्यावर 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत खाद्य पर्यटन फेस्टिव्हल घेण्यात येत आहे. यानिमित्तच्या स्पर्धा व कार्यक्रमांची रूपरेषा निश्‍चित करण्यात आली. 

मालवण - येथील किनारपट्टीवर सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दांडी किनाऱ्यावर 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत खाद्य पर्यटन फेस्टिव्हल घेण्यात येत आहे. यानिमित्तच्या स्पर्धा व कार्यक्रमांची रूपरेषा निश्‍चित करण्यात आली. 

मालवणी संस्कृती केंद्रस्थानी ठेवत खाद्य संस्कृती व सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद पर्यटकांना देण्यासाठी येथील स्कुबा डायव्हिंग वॉटर स्पोर्टस्‌ व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. 29 ला सायंकाळी चार वाजता दांडी किनारपट्टीवर गाव कमिटीच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी 10 नौकांचा सहभाग असलेली नौकानयन स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000, 1000 रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. सायंकाळी सहा वाजता होम मिनीस्टर स्पर्धा होईल. यातील विजेत्या दहा स्पर्धकांना पैठणी व साड्या पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. या वेळी नृत्याविष्कार सादर होणार आहे. 

30 ला सायंकाळी सात वाजता खुल्या गटातील मालवणी मत्स्य सुंदरी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 11 हजार 111, 5 हजार 555, तसेच 1 हजार 111 रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके व मालवण सुंदरी हा आकर्षक चषक दिला जाणार आहे. या वेळी लावणी नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. यात मालवण व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

या महोत्सवात नागरिक व पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्कुबा डायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्‌ व्यावसायिकांनी केले आहे. सौंदर्य सुंदरी व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी आपली नावे मनोज मयेकर व फूड स्टॉलधारकांनी आपली नावे दामोदर तोडणकर बंदर जेटीनजीक 25 पर्यंत द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी 
31 ला मच्छीमार व्यापारी संघटनेच्या वतीनेतर्फे रात्री सात वाजता खुली फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे 2000, 1500, 1000 रुपये व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा झंकारचे सादरीकरण होणार आहे. रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. 

किनारपट्टीवर तीन दिवस स्थानिक तसेच नामांकित शहरातील व्यावसायिकांचे खाद्य स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यामुळे पर्यटक व नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी ठरणार आहे. 

Web Title: Food Festival from 29 dec in malvan