सिंधुदुर्ग जिल्ह्यात `या` तारखेला वादळी पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

बाजारपेठांमध्ये आवश्‍यक साहित्याच्या खरेदीला जोर चढला आहे. घर दुरुस्तीसह शेतीसाठी लागणारी अवजारे बी-बियाणे खते यांची जमवाजमव सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी लागणारे अन्नधान्य व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाचा सामना करतानाच येणाऱ्या पावसाळ्याची तयारी जोरदार सुरू झाली आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 1 व 2 जुनला गडगडाटासह मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा व विजा चमकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. 

जिल्ह्यात सद्यस्थितीत अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अचानक वाढणारा उकाडा आणि थंडावा अशा वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे पाऊस जवळ आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ आल्याने पावसाळ्याच्या तयारीची धावपळ नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

बाजारपेठांमध्ये आवश्‍यक साहित्याच्या खरेदीला जोर चढला आहे. घर दुरुस्तीसह शेतीसाठी लागणारी अवजारे बी-बियाणे खते यांची जमवाजमव सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी लागणारे अन्नधान्य व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. यातच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 व 2 जूनला गडगडाटासह मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा तसेच विधान चमकण्याची शक्‍यता वर्तवली असल्याने नागरिकांची अधिकच धावपळ निर्माण होणार आहे. या अनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forecast Of Thunder Shower In Sindhudurg District