वन विभागाचा नियंत्रण कक्ष म्हणजे धूळफेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

अस्तित्वातच नाही - दूरध्वनी नोंदीही मिळाल्या अपुऱ्या; माहिती अधिकारातून प्रकार उघडकीस

सावंतवाडी - येथील वनविभागाने वन्यप्राणी उपद्रवाबाबत मदत व्हावी म्हणून उभारलेल्या नियंत्रण कक्ष म्हणजे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

अस्तित्वातच नाही - दूरध्वनी नोंदीही मिळाल्या अपुऱ्या; माहिती अधिकारातून प्रकार उघडकीस

सावंतवाडी - येथील वनविभागाने वन्यप्राणी उपद्रवाबाबत मदत व्हावी म्हणून उभारलेल्या नियंत्रण कक्ष म्हणजे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

श्री. बरेगार यांनी दिल्ल्या माहितीनुसार सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती समस्या व माकडताप हे विषय आहेत. शेतकऱ्यांनी जीवापाड प्रेम करून वाढविलेल्या माड बागायती, केळी, पोफळी यांचे नुकसान होत आहे. माकड तापामुळे अनेक जीव गेले आहेत. पण वनविभागाला याचे सोयरसुतक नाही. केवळ असंवेदनशीलपणे कोरडी सहानुभूती ती पण केवळ सभा बैठकीमध्ये दाखविली जात आहे. या आपत्तीच्या वेळी लोकांना तक्रार नोंदविता यावी याकरिता सावंतवाडी वनविभागाच्या विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परंतु माहितीच्या अधिकारात या नियंत्रण कक्षासंबंधी श्री. बरेगार यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. 

श्री. बरेगार यांनी नियंत्रण कक्ष पहावयास मिळावी अशी मागणी केली होती. परंतू तो अस्तिवातच नसल्याने माहिती अधिकारी तो दाखवू शकले नाहित. या नियंत्रण कक्षाकरीता वावरात असलेला दूरध्वनी क्रमांकाची मागणी केली सता ०२३६३-२७५००७ हा नंबर असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयाचे लेटरहेड पाहता हा फॅक्‍स नंबर असल्याचे दिसून येते. म्हणजेच या संवेदनशील विषयात देखील खोटी माहिती पुरविलेली आहे. या दूरध्वनीवर प्राप्त कॉल्सची नोंद वही मागितली असता त्यामध्ये केवळ २००७ च्या अपुऱ्या नोंदी पुरविलेल्या आहेत. नियंत्रण कक्षात रात्रपाळी करीत कार्यरत असलेल्या कर्मचारी व त्यांनी बजाविलेल्या कर्तव्यावर माहिती मागितली असता रात्रपाळी कर्मचाऱ्यांची जागाच रिक्त ठेवण्यात आलेली आहे. यावरून वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नागरिकांच्या जिवीतहानी बाबत व त्यांच्या बागायती, शेती बाबत वनविभाग किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. 
 

अर्थपूर्ण व्यवहाराची शक्‍यता
रात्रपाळीसाठी करीत असलेले नियंत्रण कक्षमधील पद रिक्त आहे. परंतु जिल्ह्यातील वनोपज तपासणी नाक्‍यावर मात्र ३-३ वनरक्षक नेमले आहेत. कारण त्या वनरक्षकांच्या नेमणुकीत व बदल्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत असतात. याबाबत सावंतवाडी वनविभाग कायम तत्परता दाखवत असतो.

Web Title: forest department control ward