esakal | ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Former MP Nilesh Rane tweet for sushant singh case comment on aaditya thakare

माजी खासदार निलेश राणे यांनी या आधी शिवसेनेवर बरीच टिका केली होती.

‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ असे व्टिट करत शिवसेनेचे नेते तथा पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. ही टिका त्यांच्यावर सुशांतसिंग रजपूत यांच्या आत्महत्येवरून झालेल्या आरोपातून केल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा  - रत्नागिरीत पावसाने मारली इतकी मजल -


रजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यात आरोप असलेल्या रिया चक्रवर्ती यांनी आपण आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचा जबाब दिला आहे; मात्र राणे कुटुंबाकडून या प्रकरणी शिवसेनेवर टिका सुरूच आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी या आधी शिवसेनेवर बरीच टिका केली होती. आता आज कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनीही यात उडी घेत अप्रत्यक्ष टिका केली आहे. त्यांनी ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम‘ असे आज सकाळी केलेल्या व्टिटमध्ये म्हटले आहे. मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्वीन आणल्यावरून याआधी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बेबी पेंग्वीन अशी उपरोधीक टिका केली होती. हा संदर्भ जोडला तर आज केलेली टिका आदित्य ठाकरे यांच्यावर असल्याचे मानले जात आहे.

संपादन ‌- अर्चना  बनगे  

loading image