गोळीबार करत माजी सरपंचाचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

सुनील पाटकर
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

महाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये  विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला व त्याला बंदूक पुरवणाऱ्या निवृत्त पोलिस उपअधिक्षा सह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या शस्त्र प्रकणात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचाच हात असल्याने तालुक्यात बेकायदा शस्त्र पुरवठा केला जातो का याचा तपासही पोलिस घेत आहेत.

पंदेरी गावात काल सकाळी साडेअकरा वाजता गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील व पथकाने गावात धाव घेतली. यावेळी हा गोळीबार डबल नळी असलेल्या बारा बोअरच्या रायफलीतून माजी सरपंच सयाजी जाधव यांनी केल्याचे उघड झाले. परंतु, जाधव आदिवासीवाडीत पळून लपून बसले होते. पोलिसांनी तेथे त्यांना ताब्यात घेतले. तपासाअंती सयाजी यांनी ही बंदूक वाकी येथील महेंद्र शिवराम म्हामुणकर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले .महेंद्र याला पकडल्यावर त्यांने धक्कादायक माहिती दिली. पोलादपूर तालुक्यात पैठण येथील सोवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक सुभाष भाऊराव मोरे (वय 66) यांनी दिल्याचे सांगितले. ही बंदूक झेकोस्लोव्हाकिया येथे बनवलेली आहे.

पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी ठाणे येथे पकडलेल्या शस्त्रसाठ्यातील गुन्हागार महाड व पोलादपूर तालुक्यातील होते. निवृत्त पोलिसांने ही बंदूक कोठून आणली याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी सयाजीकडून ती बंदूक व एक एआर गन जप्त केली आहे.
 
Web Title: the former Sarpanch Trying to create terror by firing