सिंधुदुर्गमध्ये 700 किलोचा मासा जाळ्यात !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

देवगड (सिंधुदुर्ग)- येथील विजयदुर्ग खाडीमध्ये मासेमारी करत असताना मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 700 किलोचा मासा अडकला. या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

देवगड (सिंधुदुर्ग)- येथील विजयदुर्ग खाडीमध्ये मासेमारी करत असताना मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 700 किलोचा मासा अडकला. या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनीर मुजावर हे विजयदुर्ग खाडीत मासेमारी करत होते. यावेळी त्यांना हा मासा जाळ्यात सापडला. शार्क जातीच्या 'नालया' असे या माशाच्या प्रजातीचे स्थानिक नाव आहे. 15 फूट लांब व साडे सहा पूट रुंद असलेल्या या माशाचे वजन 700 किलो आहे. माशाच्या तोंडाच्या पुढे एक करवतीच्या पात्यासारखा दिसणारा भाग असून, 32 दात आहेत. करवतीला जसे पात्याच्या दोन्ही बाजुला दात असतात तसे या माशाच्या दोन्ही बाजूला धारदार 32 दात आहेत. या माश्याबाबतची माहिती परिसरात समजल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. जाळ्यात अडकून रक्तश्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जाते.

दरम्यान, मालवणला या माशाची विक्री केली जाणार असून, याची अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत किंमत अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.

Web Title: found 700 kg fish in the sea near vijaydurg

फोटो गॅलरी