esakal | चेकपोस्टवर स्वॅब घेतलेले चौघे आढळले बाधित़.....कुठल्या जिल्ह्यात घडले ते वाचा.....
sakal

बोलून बातमी शोधा

0

जिल्ह्यात बुधवरी रात्री आलेल्या अहवालात 12 रुग्ण बाधित आढळले.

चेकपोस्टवर स्वॅब घेतलेले चौघे आढळले बाधित़.....कुठल्या जिल्ह्यात घडले ते वाचा.....

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात बुधवरी रात्री आलेल्या अहवालात 12 रुग्ण बाधित आढळले. दिवसभरात पाच आढळले होते. त्यामुळे 24 तासात एकूण 17 रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्याची बाधित संख्या 437 झाली आहे. बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयातील महिला कक्ष सेविकेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच राहिला आहे.

दरम्यान, रात्री बाधित आढळलेल्या 12 जणांपैकी चोघे कणकवली तालुक्यातील आहेत. या चौघांचे स्बॅब खारेपाटण आणि फोंडा चेकपोस्टवर घेतलेले होते.

दिवसभरात आणखी पाच व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्त संख्या 310 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नव्याने 3 हजार 417 व्यक्ती दाखल झाल्याने ऑगस्टमध्ये जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची संख्या 12 हजार 868 वर पोहोचली आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी रात्री 5 व्यक्ती नव्याने कोरोनाबाधित सापडले होते. यामुळे कोरोनाबाधित संख्या 225 वर पोहोचली होती. यातील चार रूग्ण कणकवली तालुक्‍यातील तर एक रुग्ण कुडाळ तालुक्‍यातील आहे. कणकवली तालुक्‍यात मिळालेले रुग्ण खारेपाटण आणि फोंडा चेकपोस्टवर नमूने घेतलेले आहेत. कुडाळ तालुक्‍यातील रुग्ण हा जिल्हा रुग्णालयातील महिला कक्ष सेविका आहे. हे सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 112 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 6 हजार 790 झाली आहे. यातील 6 हजार 716 नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन 74 नमूने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील 6 हजार 294 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 425 अहवाल बाधित आले आहेत. बाधितपैकी 310 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सहा व्यक्तिचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 109 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 142 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 54 कोरोना बाधित आणि 33 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 24 कोरोनाबाधित आणि 1 संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 21 कोरोना बाधित उपचार घेत आहेत. 5 कोरोनाबाधित होम क्वारंटाईन आहेत. 3 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. एका व्यक्तीची आयसोलेशन व्यवस्था सुरू आहे. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून आज जिल्ह्यातील 4 हजार 585 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 109 व्यक्ती वाढल्याने येथे 19 हजार 813 व्यक्ति दाखल राहिल्या आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमधील 39 व्यक्तीचा समावेश आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 91 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 16 हजार 13 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 40 व्यक्ती वाढल्या असून येथील संख्या 3 हजार 761 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 3 हजार 417 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या 1 लाख 76 हजार 111 झाली आहे. जिल्ह्यात 5 कंटेन्मेंट झोन वाढले असून 50 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत.

loading image
go to top