रसायनीत मोफत आरोग्य शिबीर

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

रसायनी (रायगड) - संपूर्ण रेगे हॉस्पिटल चांभार्ली, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, प्रायमा यांच्यावतीने डॉ. विवेक रेगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त चांभार्ली येथे रसायनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

यावेळी उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास  रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापति ऊमाताई मुंढे, वासांबे मोहोपाडा सरपंच ताई पवार, माजी सरपंच संदीप मुंढे, चांभार्लीचे उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, प्रायमा अध्यक्ष डॉ मनोज कुचेरीया, संपूर्ण रेगे हॉस्पिटल डॉ. रविराज जाधव, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष सुनिल कुरूप, सेक्रेटरी ऋतुजा भोसले, सदस्य बाळकृष्ण होनावळे, गणेश म्हात्रे, रेश्मी बागडे, रेश्मा कुरूप, मेघा कोरडे, आदि उपस्थित होते. 

शिबीरात परिसरातील 175 ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह, कान, नाक, घसा, नेत्र, पाठ व कंबरदुखी, मुत्रविषयक व हाडासंबधी तपासण्या करण्यात आल्या.

Web Title: Free Health Camp in rasayni