तडगाव येथे आरोग्य शिबिरात 64 रुग्णांवर मोफत औषधोपचार

अमित गवळे
मंगळवार, 19 जून 2018

मागील महिन्याच्या रविवारी (ता. 20) देखील असेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथे प्रत्येक महिन्यात अशा प्रकारे आरोग्य शिबिर राबविले जाणार आहे. तिसरे शिबिर रविवार 5 ऑगस्टला  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगांव येथे होणार आहे. 

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.

गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव, खेमवाडी, दुधणी व कोटबेवाडी परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. मागील महिन्याच्या रविवारी (ता. 20) देखील असेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथे प्रत्येक महिन्यात अशा प्रकारे आरोग्य शिबिर राबविले जाणार आहे. तिसरे शिबिर रविवार 5 ऑगस्टला  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगांव येथे होणार आहे. 

health camp

गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई यांच्या माध्यमातून डॉ. मिलन शेट आणि डॉ. अमर कारिया यांनी आरोग्य शिबीरासाठी नि:स्वार्थ पणे मदत केली. तेसेच प्रोफेसर उमेश  सिंग, नीता सिंग, नितीश, संजय, अनुज आणि श्रेया यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी आपले योगदान दिले. 

टिकेडीके परिसर विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब धायगुडे आणि युवा मित्र मंडळ ताडगावचे अध्यक्ष राकेश साठे आणि मंडळाचे सभासद यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. तर ग्रुप ग्रामपंचायत ताडगांवचे सरपंच छब्या जाधव, सदस्य आणि ग्रामस्थांनीही मेहनत घेतली.

health camp

ताडगांव ग्रामपंचायत परिसर आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे या शिबिराचा फायदा सर्वसामान्य लोकंबरोबरच आदीवासी बांधवांना ही झाला. आगामी प्रत्येक शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा. - सचिन साठे, सचिव, टिकेडीके परिसर विकास संघर्ष समिती

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free medicines for 64 patients in Health Camp at Tadgaon