भाजपसमोर ‘बहुजन विकास’चे आव्हान

संदेश सप्रे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

देवरूख - गेली सलग १५ वर्षे भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या धामापूर तर्फ संगमेश्‍वर (ता. संगमेश्‍वर) या गटात भाजपपाठोपाठ बविआची मोठी ताकद आहे. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात निभाव लागण्यासाठी शिवसेनेचा कस लागणार आहे. भाजप स्वबळावर लढणार असल्याने बविआसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.

देवरूख - गेली सलग १५ वर्षे भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या धामापूर तर्फ संगमेश्‍वर (ता. संगमेश्‍वर) या गटात भाजपपाठोपाठ बविआची मोठी ताकद आहे. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात निभाव लागण्यासाठी शिवसेनेचा कस लागणार आहे. भाजप स्वबळावर लढणार असल्याने बविआसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आरक्षणामध्ये धामापूर तर्फ संगमेश्‍वर हा जिल्हा परिषद गट मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. त्याअंतर्गत येणाऱ्या धामापूर तर्फ संगमेश्‍वर पं.स. गणाचे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष, तर आरवली या दुसऱ्या गणाचे आरक्षण त्याच सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. या गटातून भाजपच्या मीनाक्षी दीपक जाधव, तर याच गणातून शिवसेनेचे संतोष डावल आणि आरवलीतून शिवसेनेच्या नम्रता कवळकर हे सध्या प्रतिनिधित्व करीत आहेत. 

२००२ व २००७ च्या जि.प. निवडणुकीत या गटातून भाजपचे दीपक जाधव निवडून आले होते, तर २०१२ ला आरक्षणातील बदलामुळे दीपक जाधव यांची पत्नी सौ. मीनाक्षी येथील सदस्यपद भूषवित आहेत. 

मागील काही निवडणुकांचा आढावा घेतल्यास १९९२ मध्ये झालेल्या जि.प. निवडणुकीत हा गट भाजपकडेच राहिला, त्यावेळी श्रीधर फणसे विजयी झाले. १९९७ च्या निवडणुकीत हा गट बविआकडे गेला, त्यावेळी सुरेश भायजे विजयी झाले. धामापूर तर्फे संगमेश्‍वर हा गण १९९२ ला शिवसेनेकडे होता. १९९७ पासून २०१२ पर्यंत भाजप, तर गेल्या निवडणुकीत येथे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. आरवलीचा १९९२ ला काँग्रेसकडे असलेला गण १९९७ ला बविआने काबीज केला, तर २००२ ते २०१२ भाजप आणि सध्या हा गण सेनेच्या ताब्यात आहे.

सद्यःस्थितीत तालुक्‍यात शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याने दोघांच्या भांडणात येथून बविआला नामी संधी चालून आली आहे. बविआ उमेदवार निवडीत कसा तरबेजपणा दाखवणार यावर बविआचे यश अवलंबून आहे.

सध्याची आरक्षणे 
 धामापूर तर्फ संगमेश्‍वर गट - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
 धामापूर तर्फ संगमेश्‍वर गण - सर्वसाधारण पुरुष 
 आरवली गण - सर्वसाधारण महिला 

२०१२ चा जि.प. निकाल ः
 एकूण मतदान ः१६,६९४     झालेले मतदान ः १०,५६८
१. मीनाक्षी दीपक जाधव (भाजप) - ४८७२ - विजयी
२. श्‍वेता सुरेश कांगणे (बविआ) - ३७७७
३. समिधा आंबोरे - मनसे - १२५०

Web Title: In front of the BJP, Bahujan vikas challenge