फ्रुट ऍण्ड फ्लॉवर महोत्सवात किन्नर नृत्य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सावंतवाडी - येथे आयोजित करण्यात येणाऱ्या फ्रुट ऍण्ड फ्लॉवर महोत्सवादरम्यान किन्नरांचे नृत्य बघण्याची संधी सावंतवाडीकरांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच अन्य कलाप्रकारासोबत या वर्षी फणस हा विषयावरून जनजागृती करण्यात येणार आहे. उद्यानाच्या समोर 28 एप्रिल ते 1 मे या काळात होत आहे, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख सचिन देसाई यांनी आज येथे दिली. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर महोत्सव समितीचे प्रशांत भाट, सरोज दाभोलकर, दिलीप धोपेश्‍वरकर, चैतन्या बांदेकर आदी उपस्थित होते. 

श्री. देसाई म्हणाले, ""दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन मालवण येथील बाबू पोटे यांच्या हस्ते फणसाच्या झाडाला पाणी घालून करण्यात येणार आहे. या वेळी किन्नरांच्या नृत्याचे आकर्षण असणार आहे. यानंतर विविध कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे उद्‌घाटनादरम्यान ठेवलेल्या फणसाच्या झाडाचा लिलाव करण्यात येणार आहे. आणि त्या माध्यमातून उपलब्ध झालेली रक्कम पोटे यांना देण्यात येणार आहे.'' 

या वर्षी ऑरगॅनिक उत्पादकांना महत्त्व दिले आहे. सावंतवाडीच्या अव्दैत नेवगी यांनी तयार केलेल्या फणस आणि जांभूळापासून तयार करण्यात आलेल्या आइस्क्रीम लोकांसमोर सादर करण्यात येणार आहे. भात बियाण्याबाबत संशोधन करणाऱ्या संजय पाटील यांची चारशे प्रकारची विविध प्रकारची बियाणी या महोत्सवात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. पुणे येथील अमित गोडसे यांनी तयार केलेले चाळीस प्रकारची मधाचे उत्पादने या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. 

मेधा ताडपत्रे यांचा "टॉक शो' 
प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करणाऱ्या मेधा ताडपत्रे यांचा "टॉक शो' होणार आहे. भविष्यात शहरात असा प्रकल्प उभारता येऊ शकतो का याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे कचऱ्यांचा ऱ्हास होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Fruit and Flower Festival