विधायक ! 'या' शिक्षकाने घेतला पालकत्वाचा ध्यास.....

Fule Adoption Parenting Plans Parents Support In Education Ratnagiri Matrathi news
Fule Adoption Parenting Plans Parents Support In Education Ratnagiri Matrathi news

मंडणगड,(रत्नागिरी) : लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानाला बळकटी मिळेल, असे काम शिपोळे शाळेचे शिक्षक पुंडलिक शिंदे यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून केले आहे. मागील वीस दिवसांत १४ पालकत्व मिळवताना ४२ हजारांचा निधी जमा केला. त्यामुळे मंडणगड, संगमेश्वर तालुक्‍यातील विद्यार्थिनींना त्याचा शैक्षणिक लाभ होणार आहे.

 शिक्षणासाठी  सरसावले १४ पालक
मुलींचा जन्मदर कमी झाल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान ३ ते २६ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. दैनिक सकाळने या विधायक कामाची दखल घेत त्याला प्रसिद्धी दिल्यानंतर मदतीचा ओघ वाढल्याचे शिंदे यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात १४ नवीन पालक मुलींच्या शिक्षणासाठी पुढे सरसावले.

यात सदाशिव सखाराम साळुंके, वाकोला, मुंबई-९ हजार, रमेश राघो साळुंके, प्रकाश राघो साळुंके वाकोला, मुंबई-६ हजार, असा १५ हजारांचा निधी मोर्डे नं. १ शाळा, संगमेश्वर यांना सुपूर्द करण्यात आला. सिद्धी सुदेश पालशेतकर, केळशी, दापोली-३ हजार, महेशकुमार पांडुरंग घाडी, माटुंगा, मुंबई-३ हजार, मनिष केशव मांजरेकर, शिवडी, मुंबई-३ हजार, असा ९ हजारांचा निधी केंद्रशाळा चिंचघर मंडणगड यांना देण्यात आला.

प्रशांत यशवंत म्हामुणकर, गोरेगाव, मुंबई-३ हजार, गंगाराम सीताराम महाडिक, दादर, मुंबई-३ हजार, असे ६ हजार वाल्मिकीनगर शाळेला देण्यात आले आहेत. रमेश तानाजी मिरजकर, बोरिवली, मुंबई-३ हजार, अझीज अब्दुल शेख, ताडदेव, मुंबई-३ हजार, असा ६ हजारांचा निधी तिडे आदिवासी शाळेसाठी सुपूर्द करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com