जलयुक्त शिवारसाठी २१ कोटींची तरतूद

जलयुक्त शिवारसाठी २१ कोटींची तरतूद

कणकवली - जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्य शासनाने पुढील आर्थिक वर्षात ३४०० कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली आहे. या योजनेत सिंधुदुर्गातील आतापर्यंत ५३ गावांची निवड झाली असून, ३८ कोटी ३३ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. २०१६-१७ साठी २३ गावांसाठी २१ कोटी ३६ लाख रुपयांची कामे प्रगतिपथावर आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी या योजनेत समाविष्ट होणाऱ्या गावांची निवड जिल्हा समिती करणार आहे. 

राज्य शासनाने कोकणातील ५ जिल्ह्यांसाठी १३६ गावे निश्‍चित केली. यात सिंधुदुर्गातील यंदा देवगड तालुक्‍यातील वळिवडे गावात ११ कामे प्रस्तावित असून १ कोटी रुपये निधीची तरतूद आहे. शेवरेसाठी ७ कामांसाठी ५६ लाख २० हजार, वैभववाडीतील उंबर्डे १३ कामांसाठी  ७३ लाख ३० हजार, तिरवडेतर्फे १० कामांसाठी ८४ लाख २५ हजार, कणकवली तालुक्‍यातील वारगाव १६ कामांसाठी ९९ लाख २३ हजार, कसवण तळवडे ३८ कामांसाठी ९९ लाख ४६ हजार, कासार्डे धारेश्‍वर १८ कामांसाठी ८० लाख ६९ हजार, मालवण तालुक्‍यातील वायंगणीतील ७ कामांसाठी ८९ लाख, वराड १८ कामांसाठी ९५ लाख, पोईप १६ कामांसाठी ९९ लाख ५० हजार, मसुरे ९ कामांसाठी १ कोटी २७ लाख, कुडाळ तालुक्‍यातील किनळोस २७ कामांसाठी ९६ लाख २० हजार, बांबुळी ३३ कामांसाठी ९३ लाख १० हजार, केरवडे कर्याद नारूर ३५ कामांसाठी १ कोटी ९ लाख ६२ हजार, साळगाव २२  कामांसाठी १ कोटी १ लाख, वेंगुर्ला तालुक्‍यातील रावदस- कुशेवाडा ३० कामांसाठी ९८ लाख २० हजार, पेंडूर २१  कामांसाठी १ कोटी ३४ लाख १६ हजार, सावंतवाडी तालुक्‍यातील मळगाव ३२ कामांसाठी ९७ लाख ८० हजार, गेळे येथील २४ कामांसाठी ९२ लाख ८७ हजार, नेमळे ७ कामांसाठी  कामांसाठी ७० लाख ७६ हजार, माजगाव १७  कामांसाठी ९४ लाख २७ हजार, तर दोडामार्ग तालुक्‍यातील माटणेच्या १० कामांसाठी ७९ लाख आणि वझरे गावातील ७ कामांसाठी ६६ लाख रुपये मिळून यंदा २१ कोटी ३६ लाख ६१ हजार रुपये इतकी तरतूद झाली असून जवळपास ३७.३७ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जिल्हा समितीने सन २०१५- १६ या आर्थिक वर्षात ऑक्‍टोबर २०१६ मध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण ३५ गावांच्या निवडीत १६ कोटी ९७ लाख रुपये निधी खर्च केला आहे. यातून जवळपास बहुतांशी कामे प्रगतिपथावर आहेत. 

गेल्या  वर्षीच्या आराखड्यात देवगड तालुक्‍यातील पाच गावांमधून ५४ कामे प्रस्तावित होती. यातून २८ कामे पूर्ण झाली. वैभववाडी तालुक्‍यातील १४ कामामधील ९ कामे पूर्ण झाली आहेत. कणकवलीतील पाच गावांतील ८७ पैकी ५९ कामे पूर्ण झाली आहेत. मालवण चार गावांमधील ७१ पैकी ४३ कामे पूर्ण झाली आहेत. कुडाळ सात गावामधील प्रस्तावित १९९ पैकी १६६ कामे, वेंगुर्लेतील दोन गावांतील १९ पैकी १३, सावंतवाडी ६ गावांतील १२० पैकी ९८, तर दोडामार्गच्या ५ गावांतील ३३ पैकी २६ कामे पूर्ण झाली आहेत. गतवर्षी सावंतवाडी उपविभागात ३७१ पैकी ३०३ कामे पूर्ण होऊन १० कोटी ४१ लाख ५८ हजारांचा निधी खर्च झाला आहे. कणकवली उपविभागात २२६ पैकी १३९ कामे पूर्ण होऊन ६ कोटी ५६ लाख ६ हजार मिळून जिल्ह्यात एकूण निवडलेल्या ५९७ कामांपैकी ४४२ कामे पूर्ण झाली असून ३४ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी १६ कोटी ९७ लाख ६४ हजार इतका निधी खर्च झाला आहे. 

निवडलेली तालुकानिहाय गावे -
* देवगड, वैभववाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले प्रत्येकी - २
* कणकवली - ३ 
* मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी प्रत्येकी- ४
 
अधिकार समितीला ...
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या सिंचनाचे प्रश्‍न मार्गी लागत आहेत. यामुळे गावपातळीवरून जलयुक्त शिवार योजनेत निवड व्हावी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर मागणी वाढू लागली आहे. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभाग, लघु पाटबंधारे, वन विभाग, भूलज सर्वेक्षण आणि जलसंधारण विभागाकडून गावांची पाहणी केली जाते. जी गावे टंचाईसदृश आहेत अशा गावांना प्राधान्याने जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केले जाते.
 

भूजल पातळीत वाढ 
सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये खडकाच्या स्तराची रचना वेगळ्या पद्धतीची असल्याने पाणी झिरपून जाते. त्यामुळे जलयुक्तमधून साठा करूनही पाणी निचरा होते. मात्र काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून केलेल्या कामाचे चांगले रिझर्ट मिळत आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याचे मत जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

अभियानातून..... 
३७.३७ हे. क्षेत्रात सिंचन वाढवणे 
२३ गावांमधील ४२८ कामांची निवड
भूजल पातळी वाढविणे 
गाव टंचाईमुक्त करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com