दुरुस्ती न करताच निधी खर्च 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

आंबोली - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाचे तीन तेरा वाजले आहेत. गॅरेजची तर दुरुस्ती न करताच निधी खर्च दाखविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी आला. एका मजूर सहकारी संस्थेला या कामाचा ठेका देण्यात आला; मात्र काम निकृष्ट झालेले आहे. पीव्हीसी ब्लॉक ओबडधोबड असे बसविले आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

दरम्यान, मुख्य इमारत व जीप गॅरेज दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम 5,31,712 रुपये अशी आहे. याचे मूल्यांकन 5.5 लाख रुपये दाखवले. काम पूर्ण केल्याची तारीख 31 डिसेंबर 2016 आहे; मात्र प्रत्यक्षात जीप गॅरेजची कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. आतील प्लास्टरदेखील निखळलेले आहे. गेट सडलेला आहे. जीपगाडीचे फक्त टायर बदलण्यात आले. यावर लाखोंचा खर्च दाखवला. मुख्य इमारतीसमोर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ब्लॉक ओबडधोबड असे बसविले आहेत. खिडक्‍यांच्या बाजूला फरशी बसविलेली नाही. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मेडिसीन ऑफिसरसाठी व ए. एच. निवासस्थान दुरुस्त करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 5,65,547 रुपये अशी आहे. मूल्यांकन 5.25 लाख केले आहे. येथे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पासाठी 2.47 लाख रुपये खर्च केले आहेत. वाहनचालक निवासस्थान इमारत दुरुस्तीसाठी 2.25 लाखांचा खर्च दाखविला आहे. यातील कामांचा दर्जा निकृष्ट असा आहे. यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत आहे. यापूर्वीही येथे बोगस कामे झाली आहेत. त्यामुळे आंबोली आरोग्य केंद्र म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मलिदा काढण्याचे ठिकाण झाले असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Funds without amendment