esakal | Ratnagiri : पोट भाडेकरू ठेवून मूळ भाडेकरू गब्बर
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

पोट भाडेकरू ठेवून मूळ भाडेकरू गब्बर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : साळवी स्टॉप येथील मुदत संपलेले पालिकेच्या मालकीची दुकान खोके ताब्यात घेण्यात आलेले नाहीत. ही बाब सर्वसाधारण सभेत समोर आली. पालिकेची परवानगी न घेताच त्यांची दुरुस्ती करण्यात आली. अनेक खोक्यांमध्ये पीओपी आणि वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. मूळ भाडेकरूकडून हे खोके दुसऱ्या व्यक्तीला जादा भाडे आकारून देण्यात आले आहेत. पालिकेला मिळणारे भाडे अवघे ४ हजार, तर मूळ भाडेकरुंना भाडे मिळते. १० ते १५ हजार, असे मूळ भाडेकरू गब्बर झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते राजन शेट्ये यांनी सभागृहात ही बाब उघडकीस आणली. शहरातील साळवी स्टॉप येथील खोक्यांचा विषय त्यांनी उपस्थित केला. साळवी स्टॉप ते नाचणे याअंतर्गत रोडवर पालिकेच्या मालकीचे जवळपास १५ खोके आहेत. भाड्याने दिलेल्या या खोक्यांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे तरीही खोकी अद्यापही पालिका प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आलेले नसल्याची माहिती शेट्ये यांनी सभागृहात दिली. १५ खोक्यांचा कालावधी संपुष्टात आलाय.

यातील अनेक जण रस्त्यावरील फूटपाथपर्यंत आले आहेत. कराराने देताना हे खोके पत्र्याचे होते; मात्र पालिकेला कोणतीही कल्पना न देता खोक्यांचे नूतनीकरण केले आहे. खोक्यास पीओपी करून खोक्यांमध्ये एसी बसवण्यात आले आहेत. पालिकेने नाममात्र म्हणजे चार हजार मासिक भाडयाने दिलेले खोके मूळ भाडेकरूंनी शक्कल लढवत त्यात विनापरवाना सुधारणा करून ते दुसऱ्या भाडेकरुला १० ते १५ हजारांच्या भाड्याने दिले आहेत. यामध्ये मूळ भाडेकरू गब्बर होत असताना नगराध्यक्ष आणि नगरसेवक बदनाम होत असल्याचे प्रशासनाने साळवी स्टॉप येथील हे खोके ताब्यात घेऊन नव्याने लिलाव प्रक्रिया राबवावी, असा ठराव सभेत करण्यात आला.

loading image
go to top