‘गज’मुळे फलोत्पादनावर परिणाम

‘गज’मुळे फलोत्पादनावर परिणाम

सावंतवाडी - तामिळनाडूमध्ये झालेल्या ‘गज’ वादळाचा परिणाम जिल्ह्याच्या आंबा व काजू फलोत्पादनावर होणार आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया २० ते २५ दिवसांनी पुढे जाणार आहे. दिवसा जिल्ह्याचे तापमान ढगाळ असून, किमान तापमानात तब्बल आठ अंशांनी वाढ झाली आहे. दिवसा व रात्रीला प्रतिकूल वातावरणाचा सामना फळपिकांना करावा लागणार आहे.

ढगाळ हवामानाच्या परिणामुळे रब्बी हंगामातील कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १६ ते १८ अंश एवढे किमान तापमान आवश्‍यक असताना थंडीत घट होऊन २४ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात मिळालेली कडाक्‍याची थंडी आंबा व काजूच्या मोहोराला अनुकूल व योग्य असते.

गतवर्षी बदलत्या हवामानाचा फटका आंबा व काजू पिकाला बसून मोहोर पुन्हा येण्याची प्रक्रिया झाली होती. गेल्या पंधरवड्यापासून थंडीने सातत्य कायम राखले होते; मात्र तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गज’ वादळाचा तडाखा बसला. याचा परिणाम थेट कोकणासह इतर महाराष्ट्रात जाणवून सिंधुदुर्गात मध्यम व हलका स्वरूपाचा पाऊस सरींचा शिडकावा झाला.

हवामान ढगाळ वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात कमालीचा फरक निर्माण झाला. किमान तापमानात आठ अंशांंनी वाढ झाली आहे. यामुळे अगदी सुरवात होत असलेल्या आंबा पिकाच्या मोहोराला ब्रेक लागणार अाहे. जिल्ह्यात ७.२ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. या वादळाचा परिणाम रब्बी पिकांना अनुकूल ठरणार आहे. हे हवामान रब्बी पिकांना अजून १५ ते २० दिवस अनुकूल ठरणार आहे. गज वादळामुळे रब्बी कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. भात जवळपास ९८ टक्क्यांच्यावर काढणी झाली असल्यामुळे भातपीक मात्र या वादळातून बचावले आहे.

बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाचा हंगाम लांबणार आहे. काजू झाडावर ढेकण्या तर आंब्यावर करपा, भुरी, तुडतुडे, फुलकिडे, खवले किडे याच्या प्रादुर्भावाची शक्‍यता आहे.
- डॉ. यशवंत मुठाळे, 

अधिकारी, ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्प, मुळदे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com