गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचा एस.टी. व प्रवाशांना मदतीचा हात

गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचा एस.टी. व प्रवाशांना मदतीचा हात

महाड - गणेशोत्सव काळात गावी जाण्यासाठी दोन दोन दिवस बसस्थानकावर वाट पहात बसणा-या चाकरमान्यांना तीस वर्षापूर्वी जागेअभावी अनेकदा एस.टी. बसमधून खाली उतरावे लागले होते. आज याच चाकरमान्यांनी लालबागमध्ये स्थापन केलेल्या गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ एस.टी. ला व प्रवाशांना मदतीचा हात देत आहे. यावर्षी या संघाने एस.टी. च्या तब्बल आठशे गाड्या आरक्षित केल्या आहेत.

या प्रवासी संघाला विश्वासात घेऊन महामंडळ दरवर्षी जाद गाड्यांचे नियोजन करत असते. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवाला येताना चाकरमान्यांना अनेक विघ्न पार पाडावी लागतात. तीस पस्तीस वर्षापूर्वी रेल्वे नसताना केवळ एस.टी. हाच प्रवासाचा आधार होती. त्यावेळी गणेशभक्तांचे हाल व्हायचे. यासाठी  त्याकाळी दिपक चव्हाण, विश्वनाथ मांजरेकर, अशा 17 तरूणांनी एकत्रित येऊन बत्तीस वर्षापूर्वी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ स्थापन केला. प्रारंभी केवळ चाळीस गाड्या आरक्षित केलेल्या या संघाने आता आठशे गाड्या आरक्षित करण्यापर्यंत मजल मारली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग येथील प्रवासी याचे सदस्य आहेत. कोकणातील प्रत्येक गावात संघाने सदस्य नेमले असून गणपतीसाठी तीन महिन्यापूर्वी नियोजन केले जाते. प्रत्येक गावातील सदस्य गावात जाणा-या गाड्यांची मागणी व नियोजन करतो. त्यानंतर एकत्रितपणे एस.टी. कडे नियोजन दिले जाते. कोणतीही सवलत न घेता प्रवासाचे पूर्ण पैसे प्रवासी भरत असतात. कोकणाच जाण्यासाठी मुंबई, परळ, कुर्ला, नालासोपारा, बोरीवली, अर्नाळा येथून बस सुटतात. ओपेरा हाऊस ते अर्नाळा पर्यंत बावीस ठिकाणे प्रवासी चढउताराकरीता संघाने ठेवलेली आहेत. त्यामुळे कोकणात प्रवासी विनासायास एस.टी. जाऊ शकतात. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर पंढरपूर यात्रा, होळी व मे महिन्यातच असे नियोजन केले जाते. एस.टी. चे वरीष्ठ अधिकारी व संघ यांची पूर्वबैठक होत असल्याने नियोजनात बाधा येत नाही. हा संघ प्रवाशांच्या अडचणी सोडवतोच परंतु समाजपयोगी उपक्रमही राबवत आहे. चिपळूण तालुक्यातील उबळे शाळेतील दहावीची सर्व मुले संघाने दत्तक घेतली आहेत. कर्नाळा आदीवासी वाडीतही आरोग्य शिबिर व कपडे वाटपही केले जात असते. प्रत्येक गावी सभासद वाढवून प्रवाशांना सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे,

एस.टी. वाढली पाहीजे, जगली पाहीजे हे आमचे उद्दीष्ट आहे. म्हणून आम्ही एस.टी. ने प्रवास करतो. एस.टी. नेही चांगली स्वच्छतागृहे, उपहारगृहे प्रवाशांना दिली पाहिजेत. यापुढेही अधिक काम करण्याचा आमचा  प्रयत्न आहे.
दिपक चव्हाण (कार्याध्यक्ष,गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com