कोकणात गणेशोत्सवासाठी आयसी एमआरच्या गाईडलाईन नुसार नियम : उदय सामंत

तुषार सावंत | Tuesday, 28 July 2020

गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचा अपेक्षित आकडा किती असेल याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) : आगामी काळात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचा अपेक्षित आकडा किती असेल याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पोलीस विभागाने ही जबाबदारी गावच्या पोलीस पाटलांवर दिली असून बंद घरे आणि इतर संस्थात्मक क्वारंन्टाईन बाबतची
माहितीही गोळा केली जात आहे.

क्वारंन्टाईनचा कालावधी किती असावा याबाबत अजूनही मार्गदर्शन सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे संभ्रमावस्था आहे कोकणात अर्थात सिंधुदुर्ग जिल्हात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.त्यामुळे मुंबई पुणे आणि राज्याच्या किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागात वास्तव्याला असलेले चाकरमानी हे आपल्या गावाला येणार आहेत. जिल्ह्यात 405 महसुली गावांतर्गत जवळपास 63 हजार घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. प्रतिवर्षी गावांमध्ये येणाऱ्या चाकरमाण्यांचा आकडा हा तसा अंदाज व्यक्त केला जात असायचा.

हेही वाचा- साखरपात  नऊ जणांना झाली विषबाधा ; सात जणांवर उपचार सुरू ,  तर दोघांना रत्नागिरीत हलविले ; कारण सविस्तर वाचा...... -

कोकण रेल्वे, एसटी, खासगी बसगाड्या असा वेगळा पर्याय कोकणात येण्यासाठी होता. यंदा मात्र तसा कोणता पर्याय सध्या तरी सार्वजनिक वाहतूच्या माध्यमातून पुढे आलेला नाही. एसटी महामंडळाच्यावतीने बस गाड्या सोडल्या जातील असे सांगितले जात आहे. मात्र ठोस असे या निर्णयाकडे सरकार पोचलेले नाही. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण समितीने बैठक घेऊन काही नियम तयार केले आहेत. या नियमाला ही राजकीय पक्षातून मोठा विरोध झाला. त्यामुळे आता चाकरमानी कोणत्या दिवशी येणार त्यांचा क्वारंन्टाईन कालावधी तसेच जिल्ह्यात असलेली आरोग्य सुविधा हा सगळा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. नेमके चाकरमानी किती येथील अंदाज बांधण्याचे सोपे काम नाही. तरीही प्रशासनाने उचललेले पाऊल हे स्वागतार्ह आहे.

हेही वाचा-सिंधुदुर्गवासीयांनो सावधान! आता प्रशासनाच्या `तिसऱ्या डोळ्या`ची नजर -

पोलिस पाटलांना आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या गावातील बंद घरे आणि त्या बंद घरात येणाऱ्या चाकरमान्यांचा अंदाज आकडा निश्चित केला जाणार आहे. तसेच ही घरे उघडी आहेत अर्थात कुटुंबे राहतात अशा कुटुंबानं जवळ परगावातील माणूस आला तर त्याचे क्वारंन्टाईन हे संस्थात्मक करावे लागणार आहे. त्या दृष्टीकोनातूनही काय पर्याय गावांमध्ये निर्माण करता येईल यावरही विचार होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सरासरी 405 महसूल गावात अंदाजे   तर 81 हजार चाकरमानी दाखल होऊ शकतील.असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याही पुढे जाऊन नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रांमध्ये दहा हजारापेक्षा अधिक चाकरमानी आले तर जिल्ह्यात किमान एक लाखांपेक्षाअधिक चाकरमानी दाखल होतील असा सरासरी अंदाज व्यक्त होण्याची शक्यता आहे. मात्र हा आकडा पोलीस पाटलांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर असणार आहे. येत्या आठवड्याभरात ही माहिती गोळा करून जिल्हा प्रशासन पुढील नियोजन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा- दाम्पत्याला नियम मोडणे पडणार महागात, सावंतवाडी नगराध्यक्षांनी दिला इशारा -

केंद्राकडे रेल्वेच्या विषेश गाड्या सोडाण्याची  मागणी

कोरोना साथीरोगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्हातील आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे आरोग्यही दुलर्क्षीत करून चालणार नाही.त्यामुळे या विषयात राजकारण न करता, सर्व पक्षीयांना योग्य त्या सुचना देण्याचा 
विचार आम्ही करीत आहोत. राज्य सरकारने आपल्या मागण्या केंद्र सरकारला पाठविलेल्या आहेत. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर ज्या गाईडलाईन निच्छित करेल. त्याचे बंधन जिल्हाप्रशासनाला पाळावे लागणार आहे. रेल्वेच्या विषेश गाड्या सोडाव्यात अशी  मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे