खेडकुळीतील गणेश मंदिरात आज गणेशयाग

खेडकुळीतील गणेश मंदिरात आज गणेशयाग

रत्नागिरी - तालुक्‍यातील खेडकुळी येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात माघी उत्सव ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गेले तीन दिवस सायंकाळी आरती, भोवत्या आणि कीर्तन असे कार्यक्रम सुरू आहेत.  आज (ता. ८) सकाळी गणेशयाग होत आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता महापूजा, रात्री दहा वाजता आरती, भोवत्या होतील. त्यानंतर ९ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता विश्‍वनाथ भाट्ये यांचे कीर्तन होणार आहे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ श्रीगुरू बालाजी तांबे हे मूळचे खेडकुळीचे. त्यांचे आगमन आज झाले.

खेडकुळी गावातील गणपती हे तांबे घराण्याचे आराध्य दैवत आहे. याबाबतची एक कथा आहे. पूर्वीच्या काळी तांबे घराण्यातील कोणी एक महापुरुष नित्यनियमाने गणपतीपुळे येथे गणेशाच्या दर्शनासाठी जात असत. मोठ्या भक्तिभावाने पूजा करणाऱ्या या सद्‌गृहस्थाला आजारपणामुळे गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाता आले नाही. त्यावेळी स्वयंभू गणेशाने दृष्टांत देऊन ‘मी निगडीच्या बेटामध्ये आहे, माझा शोध घे,’ असे सांगितले. त्यांनी तत्काळ घराजवळीलच निगडीच्या बेटामध्ये शोध घेतला, तेव्हा त्यांना गणपतीपुळ्यातील गणपतीप्रमाणेच मूर्ती सापडली. त्यांनी त्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर काही वर्षांनी मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून उत्सवाची प्रथा अखंडितपणे सुरू आहे.

उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. पारंपरिकपणे पावित्र्य राखून सांस्कृतिक पद्धतीने पूजा-अर्चा, आरती, प्रवचन, गाणी, भोवत्यांनी उत्सवात रंग येतो. फेर धरून म्हटलेली भजने इतर गाण्यांपेक्षा व चालींपेक्षा वेगळी सुमधूर असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com