उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन

राजेंद्र बाईत
सोमवार, 9 जुलै 2018

राजापूर - गंगामाईचे 109 दिवसांनी शहरानजीकच्या उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा येथे गंगामाई जोरदारपणे प्रवाहित आहे. मुसळधार पाऊस पडत असताना अचानक झालेल्या आगमनाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, यापूर्वी तब्बल पंधरा वेळा पावसाळ्यामध्ये गंगामाईचे आगमन झाले.

गंगामाईचे 6 डिसेंबर, 17 ला आगमन झाले होते. त्यानंतर 105 दिवस वास्तव्य केल्यानंतर 20 मार्च 18 ला तिचे निर्गमन झाले. त्यानंतर 109 दिवसांनी पुन्हा एकदा तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे, राहुल काळे, श्री. साने आदी पदाधिकारी आज सकाळी नेहमीप्रमाणे गंगातीर्थक्षेत्री गेले असता त्यांना गंगामाईचे आगमन निदर्शनास आले. सुरवातीचे काही तास केवळ मूळ गंगा प्रवाहित होती. मात्र, सुमारे दोन तासानंतर काशीकुंडाच्या येथील गोमुखही प्रवाहित झाले.

काल सकाळी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती मिळताच सुरवातीला अनेकांना ती अफवा वाटली. अनेकांनी गंगामाईच्या आगमनाची गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली. अनेकांनी गंगास्थानी भेट दिली. सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गंगामाईच्या अचानक झालेल्या आगमनाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

कमीत कमी वास्तव्य 12 दिवसांचे
गंगामाईचे सर्वांत कमी वास्तव्य 12 दिवसांचे होते. जुलै,1936 मध्ये 12 दिवस, 1895 मध्ये 18 दिवस, जून 1897 ला 22 दिवस असा कमी वास्तव्याचा काळ आहे. सप्टेंबर 1918 ला तो 53 दिवसांपर्यंत वाढला; पण त्यानंतर 18 वर्षांचा खंड पडला. 10 फेब्रुवारी 2011 ला 116 दिवसांचे वास्तव्य होते. ते कदाचित अधिक ठरेल.

Web Title: gangamai water gomukh