मुंबईतील गँगस्टरला चिपळूणात अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

चिपळूण - मुंबईतील गँगस्टर व अट्टल गुन्हेगार असलेला सिद्धेश म्हसकर (36, रा. अंबरनाथ) याला पोलिसांनी चिपळूणात जेरबंद केले. ठाणे पोलिस, चिपळूण पोलिस व रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

चिपळूण - मुंबईतील गँगस्टर व अट्टल गुन्हेगार असलेला सिद्धेश म्हसकर (36, रा. अंबरनाथ) याला पोलिसांनी चिपळूणात जेरबंद केले. ठाणे पोलिस, चिपळूण पोलिस व रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

संघटित गुन्हेगारी करणार्‍यांच्या यादीत असलेला सिद्धेश म्हसकर याच्यावर हत्येचा प्रयत्न व गंभीर दुखापत करणे अशा पद्धतीचे 20 हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो महिन्यापासून पसार होता. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (एनपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र तो गायब असल्यामुळे मुंबईचे पोलिस त्याचा शोध घेत होते.

म्हसकर कोकण रेल्वेने ठाणे रत्नागिरी प्रवास करीत असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. रत्नागिरी व चिपळूण पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी व चिपळूणचे पोलिस कर्मचारी रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी चिपळूण रेल्वे स्थानकावरून सिद्धेश म्हसकरला ताब्या घेतले आणि चिपळूण पोलिसात आणले. कोपरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी चिपळूणात पोहचल्यानंतर म्हसकरला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangster from Mumbai arrested in Chiplun