समुद्रात बुडताना सहा जणांना जीवरक्षकांनी वाचवले

प्रमोद हर्डीकर
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

साडवली (रत्नागिरी): कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने सहा तरुण बुडत होते. या बुडणार्‍या तरुणांना किनार्‍यावर शहाळी विकणाऱया जीवरक्षकांनी आज (शनिवार) वाचवले.

साडवली (रत्नागिरी): कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने सहा तरुण बुडत होते. या बुडणार्‍या तरुणांना किनार्‍यावर शहाळी विकणाऱया जीवरक्षकांनी आज (शनिवार) वाचवले.

गणपतीपुळे समुद्रात आज सकाळी १२ वाजता कोल्हापुरची एक टीम व सांगलीची एक टीम अंघोळीसाठी उतरली. माञ, हे सगळे तरुण मुळचे हरियानाचे रहाणारे असल्याने इथल्या समुद्राची त्यांना कल्पना आली नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने यापैकी सहाजण पाण्यात बुडु लागले, हे पाहताच सोबतच्या तरुणांनी आरडा ओरडा केल्यावर नवीनच बोट फेरी सुरु झाल्याने त्या बोटीवरील प्रमोद डोर्लेकर व जिवरक्षक राज देवरुखकर यांनी या सहा तरुणांना बोटीच्या साहाय्याने तसेच लाईफबॉय, लाईफजॅकेटच्या साहाय्याने वाचवले. या सहा जणांना किनार्‍यावर आणले असता दोघांची प्रकृती गंभीर बनली. राज देवरुखकर यांनी माऊथश्वास दिला तरीही सुधारणा झाली नाही. या दोघांना देवस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

रोहीत पवार, शरद जाधव, प्रमोद डबडरे, महेश पशुरोमनर, सचिन सुर्यवंशी, उमेश घोडके, भरत चौधरी, विवेक कुंभार, सतीश पटेल, विक्रांत कुंभार अशी युवकांची नावे आहेत. भारत चौधरी व विक्रांत शर्मा यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. उर्वरितांवर मालगुंड रुग्णालयात उपचार करण्यात आले. जिवरक्षक राज देवरुखकर प्रमोद डोर्ले, उमेश म्हादये, जितु सुर्वे, महेंद्र झगडे, दिनेश डावरे यांनी बुडणार्‍यांना वाचवले. शहाळी विकणारे व फोटो काढणारे हे लोक पर्यटकांना वाचवण्याचे काम करतात. माञ, शासन या लोकांना दुकानाचे परवाने देण्यास टाळाटाळ करते असा उलटा न्याय आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: ganpati pule news Six people were saved by the survivors while drowning in the sea